In Igatpuri taluka, due to rain, the fields got waterlogged everywhere. In the second photograph, the discharge from the Darna dam esakal
नाशिक

Nashik Monsoon News : इगतपुरी तालुक्यावर पावसाची मेहेरबानी; भावली, दारणातून विसर्ग

Nashik News : महाराष्ट्राची चेरापुंजी तथा पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी शहरासह घोटी व तालुक्यात, कसारा घाट परिसरात दुसऱ्या टप्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्राची चेरापुंजी तथा पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी शहरासह घोटी व तालुक्यात, कसारा घाट परिसरात दुसऱ्या टप्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. सलग सात दिवसापासून संततधार सुरू असून धरणे भरू लागली आहेत. शेतकरी वर्गात भात शेतीच्या विविध कामांना वेग आला आहे. (Igatpuri taluka which is considered to be area with highest rainfall in district)

इगतपुरीत गुरूवारी सकाळपर्यत एकाच दिवसात तब्बल २१७ मिलीमीटरची धुव्वाधार बरसात झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा भाग समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पावसाने सर्वत्र दमदार आणि समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वांनीच या पावसाबाबत समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील त्रिंगलवाडी, बलायदुरी.

आडवण, टाकेघोटी, बोरटेंभे, भावली, मानवेढे, बोर्ली नांदगावसदो, पिंपरीसदो, तळेगाव, घोटी, मुकणे, सांजेगाव, आहुर्ली, म्हसुर्ली, वैतरणा, आवळखेड, दौंडत, देवळे, चिंचलेखैरे, खैरगाव, खंबाळे, शेणीत, इंदोरे, धामणगाव, कवडदरा, गिरणारे, काळुस्ते, शेनवड, मुंढेगाव, खेड, इंदोरे, माणिकखांब या भागातही दमदार पाऊस झाला आहे.

पर्यटकांची लागली रिघ

इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर येथेही सलग पावसाची संततधार सुरू आहे.पावसाचे समाधानकारक आगमन झाल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटकांनी त्र्यंबकराजाच्या चरणी लीन झाल्यानंतर तालुक्यातील निसर्ग पर्यटन अनुभवण्यासाठी कूच केली आहे.पावसाची रिपरिप सुरु झाल्यामुळे निसर्ग पर्यटनाचा मनमुराद आनंद आज पर्यटक घेताना दिसून येत आहेत.याबरोबरच पहिणे बारीतील सौंदर्य बहरल्याने त्र्यंबकला भेट देणाऱ्या पर्यटकांचा ओघ आता पहिणेबारीकडे अधिक वाढला आहे. (latest marathi news)

पावसाची सरासरीकडे वाटचाल

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे.तसेच पूर्व भागात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भातशेतीच्या उर्वरित कामांना चांगला वेग आला आहे. पश्चिम पट्ट्यातील डोंगरावरून पाण्याचे धबधबे मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत. दारणा, भाम व वाकी या नद्या या दुथडी भरून वाहत आहेत.

इगतपुरी, घोटी मानवेढे, भावली, वैतरणा, धारगाव या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. गेल्या दोन दिवसापासून पावसाचे सातत्य कायम आहे मात्र रात्रभराचा पाऊस हा अतिवृष्टी सदृश्य होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले हआहे.तालुक्यात दर हंगामात ३ हजार २०० ते ३ हजार ७०० मिलीमीटरपर्यंत पाऊस होतो.आज अखेर १ हजार ११५ मिलीमीटर पाऊस झाल्याने पाऊस यंदाही लवकरच सरासरी गाठेल असे वाटु लागले आहे.

आकडे बोलतात

आजचा पाऊस : २१७ मिलीमीटर

एकूण पाऊस : १ हजार ११५ मिलीमीटर

गुरूवारचा सुरु असलेला विसर्ग :

दारणा : ४ हजार १६२ क्यूसेक

धरणातील साठा असा

दारणा : ८१.१७, भावली : १००,

मुकणे : २७.१८,कडवा : ८१.५८

वाकी : ३२.३०,भाम : ९२.२६

वैतरणा : ८४, वालदेवी : ४६.५७

------------

गंगापुर : ४९.९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT