Illegal sand extraction going on from Girna riverbed at Lohoner esakal
नाशिक

Illegal Sand Mining : गिरणा पात्रातून खुलेआम वाळूउपसा! लोहोणेर येथे रात्रंदिवस ट्रॅक्टर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोहोणेर गावानजीक गिरणा नदीपात्रातून खुलेआम वाळूचा उपसा सुरू आहे. महसूल यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याच्या मेहरबानीमुळे मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरू असून रोज रात्री उशिरापर्यंत हजारो ब्रास वाळू उपसा होत आहे. या वाळू तस्करीकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. (Illegal sand mining is going on from Lohoner Girna river bed)

या वाळू तस्करीतून मोठी माया जमा होत असल्याने स्थानिक वाळू तस्करासह बाहेरगावाहून या ठिकाणी वाळू तस्कर येत असल्याने अवैध वाळू उपसा जोरदार सुरू आहे. ही वाळू तस्करी कोणाच्या मेहरबानी खाली सुरू आहे असा प्रश्न लोहोणेर येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक बच्छाव व ग्रामस्थांनी केला आहे.

लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू चोरी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे, याकडे तलाठी, मंडल अधिकारी यांचे लक्ष का जात नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दिवसेंदिवस वाळू तस्करांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. (latest marathi news)

दररोज बिनबोभाटपणे वाळू उचलली जात असून लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाळू तस्कराची हिंमत वाढली आहे. पहाटेपर्यत गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचे ट्रॅक्टर जाताना दिसतात.

रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टरच्या साह्याय्याने वाळू उपसा करण्यात येत आहे. यामुळे गिरणा नदीपात्रात असलेल्या सर्व पाणीयोजना धोक्यात आल्या असून पाण्याची पातळी खाली गेली आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणावर जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत असा आरोप बच्छाव यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT