A grand 5625 square feet Maharangoli made by the New Year Swagat Committee at Godaghat.  esakal
नाशिक

Nashik News: महारांगोळीतून साकारले भरडधान्यासह मतदानाचे महत्त्व! गोदाघाटावर साकारली साडेपाच हजार चौरस फुटांची महारांगोळी

Nashik News : राष्ट्र हितासाठी मतदान करण्याच्या आवाहनाबरोबरच मानवी जीवनासाठी सकस अशा भरडधान्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर सुरू असलेल्या पाच दिवसीय महोत्सवात रविवारी (ता.७) भरडधान्याच्या माध्यमातून ७५ बाय ७५ फूट म्हणजे पाच हजार सहाशे पंचवीस चौरस फुटांची महारांगोळी साकारली. यातून राष्ट्र हितासाठी मतदान करण्याच्या आवाहनाबरोबरच मानवी जीवनासाठी सकस अशा भरडधान्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ही रांगोळी सोमवार (ता.८) पर्यंत नाशिककरांना बघता येणार आहे. (Nashik Maharangoli five half thousand square feet made at Goda Ghat news)

राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास व नाशिक महापालिकेच्या विद्यमाने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तिसऱ्या दिवशी रविवारी (ता.७) सकाळी साडेसहापासून पाडवा पटांगणावर महारांगोळीला सुरवात झाली. यंदा ‘स्वदेशी’ ही थीम आहे. नीलेश देशपांडे यांची ही रचना असून या संकल्पनेचे प्रमुख म्हणून आरती गरुड तर सहप्रमुख म्हणून सुजाता कापुरे व मयूरी शुक्ल यांनी जबाबदारी पार पाडली.

यासाठी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल चव्हाण, वास्तुविशारद मिलिंद कुलकर्णी व श्रीकांत वाणी यांचे सहकार्य लाभले. सकाळच्या सत्रात शुभदा जगदाळे या प्रमुख पाहुण्या होत्या. सायंकाळी उद्घाटन सोहळ्यास संजय पाटील, चंदुकाका सराफ, लीना बनसोड, जयवंत बिरारी, संजय देवरे, महेंद्र छोरिया आदी मान्यवर उपस्थित होते.

वापरलेले धान्य

महारांगोळीसाठी तब्बल १२०० किलो नाचणी, ३०० किलो वरई, ४०० किलो बाजरी, १०० किलो मूग, ५० किलो कोदरा, ४०० किलो ज्वारी, २०० किलो राळा, १०० किलो उडीद आणि २०० किलो मसूर अशा एकूण ३००० किलो इतक्या भरडधान्यचा वापर केला. १०० महिलांनी अवघ्या चार तासांत ही महारांगोळी साकारली.

भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य (मिलेट) वर्ष म्हणून घोषित केले होते. म्हणूनच त्यानिमित्ताने मिलेट्स, श्रीअन्न, तृणधान्य यांचे आपल्या आहारातील महत्त्व वाढावे, या हेतूने ही भव्य रांगोळी साकारली आहे.  (latest marathi news)

विविध स्पर्धांचे आयोजन

महारांगोळीनिमित्त याठिकाणी भरडधान्य पाककला स्पर्धाही आयोजित केली होती. स्पर्धेत भारती सोनवणे यांनी प्रथम, सुप्रिया गोस्वामी द्वितीय तर सुचेता हुदलीकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रांगोळीसाठी वापरलेले भरडधान्य स्वच्छ करून गरजू संस्थांना पोचविले जाणार आहे.

यशश्री रहाळकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष शिवाजी बोंदार्डे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी, गुणगौरव न्यासचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, राजेश दरगोडे, जयंत गायधनी, जयेश क्षेमकल्याणी, स्वरूपा मालपुरे आदी उपस्थित होते.

उद्या ‘वारसा’ युद्धकलेचे प्रात्यक्षिक

कार्यक्रमात सोमवारी (ता.८) छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. यावेळी उपस्थितांचे डोळ्याचे पारणे फेडणारा ‘वारसा’ अर्थात युद्धकलेचे प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास नाशिककरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT