Nashik News : म्हसरूळ- वरवंडी रोडवर अतिप्राचीन सिता सरोवर आहे. या सरोवरास अनन्यसाधारण असे धार्मिक महत्त्व आहे. मात्र, या ठिकाणी कायमच अस्वच्छता दिसून येते. जागोजागी कचरा पडलेला दिसतो. सीता सरोवराचे असलेले कुंडदेखील अस्वच्छ असून यातदेखील निर्माल्य पडलेले असते. यामुळे सीता सरोवराचे असलेले पवित्र धोक्यात आले असून याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी स्थानिकांसह भक्त भाविक करीत आहे. (nashik Impurity is always visible at sita sarovar marathi news)
म्हसरूळ गाव परिसरात वरवंडी रोडवर अतिप्राचीन सिता सरोवर आहे. प्रभू प्रभू श्रीरामचंद्राचे वास्तव्य होते आणि या ठिकाणाहून गुप्त मार्गाने माता सिता स्नानासाठी जात होती अशी आख्यायिका आहे. या ठिकाणाला अनन्य साधारण असे धार्मिक महत्त्वदेखील आहे. मात्र, या सीता सरोवराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे.(latest marathi news)
या ठिकाणी म्हसरूळ शिवारातील ग्रामस्थांचे दशक्रिया विधीचे कार्यक्रमदेखील होत असतात. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीकडे अनेक भाविकदेखील येत असतात. सीता सरोवर परिसरात अस्वच्छता दिसून येते. यात काही ठिकाणी कचरा साचलेला दिसतो. तर काही ठिकाणी मद्यपींचे ग्लास, दारू बाटल्या दिसून येतात.
तसेच सीतासरोवरच्या मुख्य कुंडातील पाणी आटलेले असून त्यात निर्माल्य दिसून येते. यामुळे या सरोवरातील पाणी अत्यंत गढूळ झाल्याचे दूषित झाले असून दुर्गंधीदेखील पसरते. या ठिकाणी नेहमीच कचऱ्याचे साम्राज्य दिसते. येथे होणारे दशक्रिया विधी वेळी कर्तन केलेले केस पडलेले असतात. याकडे महापालिकेने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणीदेखील जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.