Nashik News : शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील सर्व विभागातून महिला अर्ज करत आहे. यासाठी बँक खाते गरजेचे असल्याने शहरातील टपाल खात्यात १७ दिवसात १६ हजार महिलांनी खाते बँक खाते उघडले आहे. राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारतर्फे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. (in 17 days 16 thousand women opened account for Ladki Bahin Yojana in post office)
३१ ऑगस्टपर्यंत लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदत दिली आहे. अर्ज करताना त्यावर शासकीय बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. योजना सुरू होताच ऑनलाइन पद्धतीने अर्जावर नमूद केलेल्या शासकीय बँक खात्यात लाभार्थ्यांची दीड हजारांची रक्कम जमा होणार आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र अर्ज करण्यासह बँक खाते उघडण्यासाठी महिलांची गर्दी उलटली आहे.
शासकीय बँकेत बँक खाते उघडण्यासाठी होणारी गर्दी आणि किचकट अटी यामुळे बहुतांशी महिला वर्ग खाते उघडण्यासाठी टपाल कार्यालयाकडे वळला आहे. मुख्य टपाल कार्यालयासह शहरातील विविध टपाल कार्यालय आणि इंडियन पोस्ट बँकेत खाते उघडण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे.
१ ते १७ जुलै अशा केवळ १७ दिवसात इंडियन पोस्ट बँकेत सुमारे १४ हजार महिला आणि तरुणींनी खाते उघडले आहे. तर नाशिक विभागातील टपाल कार्यालयात २ हजार ७७ तसेच केवळ टपाल कार्यालयात ५५० असे टपाल विभागाच्या दोन्ही बँकेत तब्बल १६ हजार ६२७ लाडक्या बहिणींनी आपली खाती उघडली असल्याची माहिती वरिष्ठ पोस्ट मास्तर गोपाळ पाटील यांनी दिली. (latest marathi news)
स्वातंत्र्य व्यवस्था
लाडकी बहीण योजनेसाठी बँक खाते उघडण्यासाठी होणाऱ्या गर्दीने टपाल विभागाच्या अन्य कामांवर परिणाम होऊ नये. ग्राहकांची गैरसोय होऊ नये. तसेच खाते उघडण्यासाठी महिलांना अडचण येऊ नये. यासाठी टपाल कार्यालयात अल्पबचत खाते उघडण्यासाठी कार्यालयातच स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इंडियन पोस्ट बँकेनेही ऑनलाइन खाते उघडण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. या दोन्ही ठिकाणाहून महिलांना खाते उघडण्याची सोय होणार आहे.
"लडकी बहीण योजनेसाठी महिलांना बँक खाते उघडण्यासाठी टपाल कार्यालयात व्यवस्था करून देण्यात आली आहे. खाते उघडताना महिलांना अडचण येत असल्यास त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. गेल्या १७ दिवसात खाते उघडण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे." - गोपाळ पाटील, वरिष्ठ पोस्ट मास्टर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.