नाशिक : लोकसभा निवडणुकीत राज्यात पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या भाजपने विधानसभा निवडणुकीत ताकही फुंकून पिण्याची भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे विधानसभेसाठी नियुक्त करण्यात आलेले प्रभारी कार्यकर्त्यांकडून मतदारांचा कौल भाजपची परिस्थितीसंदर्भात आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात ४० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा करणाऱ्या भाजपचा दारुण पराभव झाला. (charge workers will take stock of voter opinion regarding BJP )
अवघ्या नऊ जागांवर भाजपला समाधान मानावे लागले. अनपेक्षित निकालाने भाजपचे धाबे दणाणले आहे. महाराष्ट्रासारखे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले राज्य विधानसभा निवडणुकीत हातचे जाऊ नये यासाठी धडपड सुरू झाली आहे. अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांचे दौरे सुरू झाले असून, दुसरीकडे कार्यकर्त्यांचीदेखील मते जाणून घेतली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विभागनिहाय कार्यकर्ता संवाद मेळावा नुकताच पार पाडला. या मेळाव्यात त्यांनी प्रचाराची दिशा निश्चित केली. दुसरीकडे संघटनात्मक बांधणी करतानादेखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तळाचे कार्यकर्ते भाजपमध्ये ओढून घेण्याचे आवाहन केले. कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडल्यानंतर तीन दिवसानंतर त्यांनी मंडलनिहाय बैठका घेण्याचे नियोजन केले होते. (latest marathi news)
अद्यापपर्यंत अशी बैठक झाली नसली तरी प्रदेश पातळीवरून विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या प्रभारींकडून कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी नाशिक महत्त्वाचे आहे. महापालिकेसह शहरात तीन आमदार भाजपकडे आहे. सत्तेच्या दृष्टीने महत्त्वाची संपत्ती हातची जाऊ नये यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे. त्या दृष्टीने प्रभारी कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाबद्दल मते जाणून घेणार आहे. मंगळवार (ता.१) पासून प्रभारींचे दौरे सुरू होणार आहे.
अशी आहेत प्रभारींची नावे
- नाशिक पूर्व- चित्रा वाघ
- नाशिक पश्चिम- नंदू महाजन
- नाशिक मध्य- खासदार स्मिता वाघ
या विषयावर होणार कार्यकर्त्यांशी संवाद
- मतदारसंघात भाजपची स्थिती.
- राज्य सरकारची विकास कामे व नागरिकांची मते.
- अपूर्ण प्रकल्पांबाबत नागरिकांची मते.
- नागरी व पायाभूत सुविधा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.