Ozar municipal Council esakal
नाशिक

Nashik News : ओझर नगरपालिकेत कामकाजाच्या वेळा लावण्यातही टाळाटाळ

Nashik News : गेल्या वर्षभरापासून ओझर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अन् प्रशासकांची येवला येथे बदली होऊन त्यांनाच प्रभारी 'चार्ज' बहाल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

ओझर : गेल्या वर्षभरापासून ओझर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अन् प्रशासकांची येवला येथे बदली होऊन त्यांनाच प्रभारी 'चार्ज' बहाल करण्यात आला. परंतु यामुळे ओझरकरांच्या मनस्ताप कमी होण्या ऐवजी तो वाढत चालला आहे. मागील वर्षी मुख्याधिकारी किरण देशमुख यांची येवला येथे पूर्ण वेळ बदली झाली परंतु अचानकपणे त्यांनाच प्रभारीपद दिले गेले. (In Ozar municipal reluctance to set working hours)

त्यानंतर ओझरच्या समस्यांचे कायम राहिल्या. स्थानिक व विस्तारलेल्या उपनगरातील नागरिक वेळापत्रक अभावी हेलपाटे माराव्या लागत आहे. संबंधित विभागांचे अनुभवी अधिकारी हे काम करूनही त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अंतर्गत बदल्यांबाबत नो कमेंट्सची पट्टी लावली गेली आहे.

कामकाजाचे वेळापत्रक कधी

शासकीय अधिकाऱ्यांना कामकाज व तक्रार निवारणाचे वेळापत्रक लावणे नियमात असताना येथे तसे कुठलेही वेळापत्रक नाही. अधिकारी गैरहजर असतानाही महत्त्वाच्या फाइल ठरलेल्या चौफुलीवर निकाली काढण्यात येत असल्याने ओझरच्या स्थिर विकास हवेत विरल्याचे यातून स्पष्ट दिसते.

तत्कालीन ग्रामविकास अधिकारी बापू फुला आहीरे यांच्याकडे ओझरचे प्रभारीपद असताना त्यांनी मुख्य प्रवेशद्वारावरच ओझर कामकाज दिवस आणि वेळ याचे मोठे फलक लावले होते. पण सध्या मात्र प्रभारी कामकाजात या फलकाला मुहूर्त लागत नसल्याने संशय निर्माण होत आहे. सध्या ओझरला विना कर्णधार सामना खेळावा लागत असल्याचे चित्र आहे. (latest marathi news)

तब्बल दहा दिवसांनंतर प्रभारी कार्यालयात!

सकाळ ने वेळापत्रक नसल्याचे समोर आणल्यानंतर केबिन बाहेर ते लावले नसल्याने नागरिकांना गृहीत धरण्याची भावना स्थानिक नागरिकांत निर्माण झाली आहे. मुख्यालयात कुणालाही प्रभारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीविषयी विचारल्यास ‘नाही माहीत' हेच उत्तर कानी पडते. नाशिक मेट्रोचे महत्वाचे भाग बनत ओझरची वाटचाल करत आहे.

लाखाच्या घरात गेलेल्या ओझरला कधी कायमचा वाली मिळणार हे न सुटणारे कोडे झाल्याची भावना आहे. त्यामुळेच दोन तीन जण यांनाच साहेबांचे आगमन होत असल्याचे कळते इतरांना अचानक दर्शन होत असल्याने त्याला कॉर्पोरेट टच मिळणे आपसूक येऊन जाते.म्हणूनच केबिन बाहेर फलक लाऊन ओझरकरांना सेवा कधी मिळणार याचे वेळापत्रक लावणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT