In Police Security released water from Kashyapi dam  esakal
नाशिक

Nashik News : पोलिस बंदोबस्तात काश्‍यपीतून पाणी सोडले; तूर्त संकट टळले

Nashik News : काश्‍यपी धरणात पाणीसाठा करण्याची आवश्‍यकता नसताना स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक शेतकयांच्या आडमुठेपणामुळे गंगापूर धरणात सोडले जाणारे पाणी अडविले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : काश्‍यपी धरणात पाणीसाठा करण्याची आवश्‍यकता नसताना स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक शेतकयांच्या आडमुठेपणामुळे गंगापूर धरणात सोडले जाणारे पाणी अडविले होते. परंतु पोलिस बंदोबस्तात पाचशे क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची जलपातळी दीड मीटरने वाढली. (In Police Security released water from Kashyapi dam)

परिणामी नाशिककरांवरील जलसंकट पुढे ढकलले गेले आहे. मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर जवळपास दीड टीएमसी पाण्याची बचत झाली.

असली तरी त्यापूर्वी जायकवाडीसाठी पाणी सोडले गेले. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या आरक्षणात कपात झाली. पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिकेने ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविली. परंतु धरणांतील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता आरक्षण घटले. नाशिकसाठी ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले.

शहराला दररोज २० दशलक्ष घनफूट पाणीवापर लक्षात घेता अठरा दिवसांच्या पाण्याचा शॉर्टफॉल आहे. जून महिन्यात पुरेसा पाऊस न पडल्याने संभावित नैसर्गिक संकटाचा सामना करण्याची तयारी सुरू असतानाच काश्‍यपी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या काहींनी धरणातून पाणी सोडण्यास मज्जाव केला. काश्‍यपी धरणात ४१९ दशलक्ष घनफूट पाणी होते. (latest marathi news)

भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास विरोध केला. शेतकऱ्यांच्या दबावामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून पाणी सोडू नये, अशी मागणी केली. गंगापूर धरणात शहरासाठी पाणी आरक्षित करताना समूह म्हणून पाणी आरक्षित केले जाते. त्यामुळे काश्‍यपीमधून पाणी सोडणे गरजेचे असल्याने जलसंपदा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तत्काळ पोलिस बंदोबस्त मागविला. पोलिस बंदोबस्तात सोमवारी (ता. २४) पाणी सोडण्यात आले.

जॅकवेलपर्यंत पाणी पोचणार

गंगापूर धरणातील जलपातळी ६१२.३ मीटरपर्यंत पाणी ठेवावे लागते. ६०० ते ५९९ पर्यंत जलपातळी घटल्यास पाणीकपात अटळ असते. काश्‍यपीतून पाणी सोडण्यात आल्याने दीड मीटरने जलपातळीत वाढ झाली आहे. ५०० क्यूसेस वेगाने काश्यपीतून गंगापूर धरणाच्या दिशेने पाणी सोडल्याने मंगळवारी सकाळपर्यंत गंगापूर धरणात काश्यपीचे पाणी पोचले. यामुळे महापालिकेच्या जॅकवेलपर्यंत पाणी पोचण्यातील अडचण दूर झाली असून जलसंकट तूर्त पुढे ढकलले गेले आहे.

गंगापूर धरण समूहातील पाणी परिस्थिती (दशलक्ष घनफुटात)

धरण उपलब्ध पाणी साठा टक्केवारी

गंगापूर ९१८ १६.३१

काश्‍यपी ४१९ २२.६२

गौतमी १९० १०.१७

--------------------------------------

एकूण १५२७ १६.३३

"काश्‍यपी धरणातून गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग झाल्याने धरणातील जलपातळी वाढली असून जॅकवेलपर्यंत पाणी येण्यातील अडचण दूर झाली आहे. त्यामुळे जलसंकट पुढे ढकलले गेले आहे." - अविनाश धनाईत, अधीक्षक अभियंता, महापालिका.

"स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मार्ग काढला. काश्यपी धरणातून गंगापूर धरणात ५०० क्यूसेस वेगाने पाणी सोडले." - सोनाली शहाणे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT