nitin pawar  esakal
नाशिक

Nashik News : कळवण नगरपंचायतीच्या कार्पोरेट इमारतीचे 2 ला उद्घाटन; सर्वसोयींनीयुक्त अद्ययावत

रवींद्र पगार

Nashik News : ग्रामपालिकेतून ‘क’ वर्ग नगरपंचायतीमध्ये रुपांतरित झालेल्या कळवण नगरपंचायतीची अद्ययावत प्रशासकीय इमारत गांधी चौकात साकारत आहे. या इमारतीचे काम पूर्ण होत आले असून ही वास्तू अद्ययावत सर्व सोयीयुक्त असून, कॉर्पोरेट लुक असलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत २ ऑगस्टला होत आहे. (Inauguration of Corporate Building of Kalwan Nagar Panchayat on 2 august )

कळवण शहराची वाढती लोकसंख्या बघता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगरपंचायतीची सुसज्ज इमारत व्हावी, या उद्देशाने या वैशिष्ट्यपूर्ण इमारतीच्या बांधकामासाठी निधी व विशेष अनुदानासाठी आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत शिष्टमंडळाने तत्कालिन नगरविकास मंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पात नगरपंचायतींना देण्यात येणाऱ्या कामांसाठी विशेष अनुदानांतर्गत पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.

१९८७ मध्ये उभारण्यात आलेल्या ग्रामपालिकेच्या इमारतीतच नगरपंचायतीचे कामकाज सुरू होते. इमारतीची स्थिती पाहता कामकाजात अनेक अडचणी येत होत्या. राज्य शासनाने अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली होती. निधी प्राप्त झाल्यानंतर जुनी इमारत पाडून बांधकामास सुरुवात करण्यात आली. आज इमारत पूर्णत्वास येऊन कामगार इमारतीवर अखेरचा हात फिरवताना दिसत आहे.

अशी असेल प्रशासकीय इमारत

- कळवण नगरपंचायतीची नवीन प्रशासकीय इमारत गांधी चौकात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असेल. सर्व विभागांसाठी स्वतंत्र दालन असणार आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, विषय समिती सभापतीसाठी स्वतंत्र दालन, स्वतंत्र सभागृह असेल. नागरिकांच्या सेवेसाठी तळमजल्यावर स्वतंत्र कर आकारणी विभाग व अंध-अपंगांच्या सोयीसाठी उद्वाहकाची सोय करण्यात येणार आहे. (latest marathi news)

- ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर आधारित वास्तुरचना असून, नैसर्गिक वस्तूंचा बांधकामासाठी जास्तीत जास्त प्रमाणात ग्रॅनाईट, दगड, गोध्रा वीट, गोध्रा जाळ्या यांचा वापर करण्यात येणार आहे. मोकळ्या हवेसाठी गरम हवा वरच्या दिशेने बाहेर काढण्याची सोय करण्यात येणार आहे.

पगारांच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा लोकार्पण

१९२२ मध्ये कळवण ग्रामपालिकेची स्थापना झाल्यानंतर जुन्या कौलारू घरात कामकाज सुरु होते. १९८७ मध्ये कौतिक पगार हे सरपंच झाल्यानंतर जुन्या घराचे नविन आरसीसी इमारतीत बांधकाम करत ग्रामपंचायतीचा लोकार्पण सोहळा झाला. त्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले. गेल्या तीन दशकांपासून ग्रामपालिकेची धुरा आपल्याकडे कायम ठेवली. २०१५ मध्ये ग्रामपालिकेचे रुपांतर नगरपंचायतीत झाल्यांनंतर नगरपंचायतीत वर्चस्व कायम ठेवत शहरात विकासाची कामे करत शहराचा चेहरा बदलला.

''कळवण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावून शहरांचा चेहरामोहरा बदलला आहे. मतदारसंघात विविध विभागात प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करून मतदारसंघातील विविध विकासकामांना कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे विकासकामांना मतदारसंघात गती आली आहे.''- नितीन पवार, आमदार, कळवण

''कळवणची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मध्यवर्ती ठिकाणी नगरपंचायतीची सर्वसोयींनी युक्त प्रशासकीय इमारतीसाठी आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून अर्थसंकल्पात पाच कोटी मंजूर झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार सह मान्यवर उपस्थित २ऑगस्ट२०२४ रोजी संपन्न होत आहे.''- कौतिक पगार, नगराध्यक्ष, कळवण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

Share Market Today: शेअर बाजार नव्या उच्चांकासाठी सज्ज; कोणते शेअर्स असतील तेजीत?

Tirupati Laddu Recipe: घरीच बनवा खास तिरूपती लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

SCROLL FOR NEXT