Nashik Police Commissioner Sandip Karnik esakal
नाशिक

Nashik Police: पोलीस ठाण्यांच्या प्रभारींची होणार खांदेपालट! ‘अर्थ’कारण भोवणार; पोलीस आयुक्तांपर्यंत प्रभारींच्या तक्रारींचा पाढा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police : गेल्या काही दिवसांपासून शहर आयुक्तालय हद्दीतील प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या खांदेपालटाची चर्चा शहर पोलीस वर्तुळात आहे. शहरातील पोलीस प्रभारींच्या अतिशय गंभीर स्वरुपाच्याच तक्रारी थेट पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कोणाची उचलबांगडी होते अन्‌ कोणाकडे नवीन जबाबदारी येते याकडे शहर पोलिसांचे लक्ष लागून आहे. (Nashik incharge of police stations will be replaced)

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सायबर पोलीस ठाण्यासह १४ पोलीस ठाणे आहेत. सहा महिन्यांपूर्वी काही फेरबदल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले होते. यात अंबड, गंगापूर, इंदिरानगर, मुंबई नाका, आडगाव, देवळाली कॅम्प, सरकारवाडा या पोलिस ठाण्यांच्या प्रभारींचा समावेश होता. परंतु अवघ्या सहा महिन्यांमध्येच पुन्हा आयुक्तालय हद्दीत पोलीस प्रभारींच्या फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही फेरबदल केले होते. परंतु या दरम्यान शहराती गुन्हेगारी घटनाही वाढल्या आहेत. तर, प्रलंबित तपासामध्येही प्रभारी पोलीस निरीक्षकांकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याच्या बाबी साप्ताहिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये उघड झाल्या आहेत. तर काही प्रभारींविषयीच आयुक्तांकडे तक्रारींचा पाढा वाचला जात आहे.

सर्वसामान्य नागरिकांना थेट आयुक्तालयात येऊन आयुक्तांकडे आपल्या तक्रारींचा पाढा वाचावा लागतो आहे. यासह अनेक बाबींच्याही तक्रारी आयुक्तांकडे आल्याने अशा प्रभारींच्या कामकाजासंदर्भात आयुक्त नाराज असल्याची चर्चा आयुक्तालयात आहे. त्यामुळे काही पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना हटविले जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, येत्या काही दिवसात हे बदल होतील असे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. (latest marathi news)

‘आर्थिक’ हितसंबंध भोवणार

काही पोलिस ठाण्यांच्या प्रभारींसंदर्भात थेट आर्थिक हितसंबंधाच्या तक्रारी आयुक्तांपर्यंत पोहोचल्या आहेत. अशा तक्रारी आल्याने आयुक्तालयाच्या प्रतिमेलाच तडा गेल्याने याबाबत आयुक्त गंभीर आहेत. त्यामुळे आर्थिक हितसंबंधातून ज्या प्रभारींच्या तक्रारी आल्या आहेत, तर काही प्रभारींनी थेट गुन्ह्यातील संशयितांनाच मदत केल्याचीही माहिती आयुक्तांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अशा प्रभारींची उचलबांगडी निश्चित मानली जात आहे.

फेरबदलही शक्य

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या पोलीस दलामध्ये बदल्यांचे वारे सुरू आहेत. आयुक्तालयातही नव्याने आठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. परंतु अद्याप त्यातील दोनच अधिकारी रुजू झाले आहेत.

सगळे अधिकारी हजर झाल्यानंतर पोलीस ठाण्यांचे प्रभारी आणि शहर गुन्हेशाखांच्या प्रभारींमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. सध्या युनिट एकची जबाबदारीही अतिरिक्त असून, याशिवाय काही पथकांकडे पोलीस निरीक्षक नाहीत. त्यामुळे अशाठिकाणी नवीन अधिकाऱ्याकडे जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT