Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : सरकारी मालमत्तांवर चोरट्यांचा डोळा! सातपूर, देवळाली कॅम्‍पमध्ये साहित्‍य चोरीच्‍या घटना

Nashik News : सरकारी मालमत्तेवरही आता चोरट्यांचा डोळा असल्‍याचे समोर येत आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातपूर व देवळाली कॅम्‍प येथून साहित्‍य चोरून नेल्‍याच्‍या घटना उघडकीस आलेल्‍या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सरकारी मालमत्तेवरही आता चोरट्यांचा डोळा असल्‍याचे समोर येत आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातपूर व देवळाली कॅम्‍प येथून साहित्‍य चोरून नेल्‍याच्‍या घटना उघडकीस आलेल्‍या आहेत. यामध्ये सुमार ५५ हजारांहून अधिकचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे. पहिल्‍या घटनेत सातपूर परिसरातील के. व्‍ही. सातपूर, जुने उपकेंद्र येथून चोरट्यांनी ट्रान्स्फॉर्मर व इतर महत्त्वाचे साहित्‍य चोरून नेले. (Incidents of theft of government literature in Satpur Deolali camp)

मंगळवारी (ता. ६) मध्यमरात्रीतून केलेल्‍या चोरीत ३३ हजार २०४ रुपये किमतीचा माल चोरीस गेल्‍याची फिर्याद महाराष्ट्र स्‍टेट ट्रान्‍समिशन कंपनी लिमिटेडच्‍या उपकार्यकारी अभियंता प्राजक्‍ता घुले यांनी सातपूर पोलिस ठाण्यात दिली आहे.

दुसऱ्या घटनेत देवळाली कॅम्‍प परिसरातील छावणी परिषदेच्‍या कार्यालयातील पाणीपुरवठा विभागातर्फे अग्‍निशमन बंबामध्ये पाणी भरण्यासाठी, तसेच देवळाली परिसरातील नागरिकांना टँकरमार्फत पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्‍या विहिरीत बसविलेली मोटार व इतर साहित्‍य चोरट्यांनी लांबविले.

इलेक्‍ट्रिक मोटार, केबल वायर, पीयूसी पाइप, इलेक्‍ट्रिक स्‍टार्टर असा २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी २४ एप्रिलला सकाळी साडेअकराच्‍या सुमारास चोरून नेला. याप्रकरणी छावणी परिषद कार्यालयातील पाणीपुरवठा अभियंता स्‍वप्‍नील क्षत्रिय यांनी देवळाली कॅम्‍प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (latest marathi news)

अंबडमधील कंपनीत चोरी; तीन संशयितांना अटक

अंबड औद्योगिक वसाहतीतील नारखेडे स्वीच गेअर कंपनीतून ६ ते ८ मे या कालावधीत चोरट्यांनी सुमारे १५ हजार ९१० रुपये किमतीचा माल चोरून नेला. याप्रकरणी गणेश मुरलीधर भोळे यांनी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करताना तीन संशयितांना गुरुवारी (ता. ९) अटक केली आहे.

रवींद्र रंका पंडा (वय ४८, रा. सिंहस्‍थनगर, सिडको), जयप्रकाश अमरप्रकाश जावळे (वय ४९, रा. उपेंद्रनगर, सिडको) आणि विनोद रमेश अवचारे (वय ४०, रा. वासननगर, पाथर्डी फाटा) अशी संशयितांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT