Summer Heat esakal
नाशिक

Nashik Summer Heat : राज्यातील ‘हॉट’ जिल्ह्यांत नाशिक! पारा चाळिशी पार गेल्याने 10 वर्षांचे ‘रेकॉर्ड ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिकचा पारा चाळिशीपार पोहोचल्याने नागरिकांना भर दुपारी घराबाहेर पडणे अशक्य होत आहे. गेल्या दहा वर्षांतील सरासरी तापमानाचा पारा ओलांडल्याने राज्यातील सर्वाधिक उष्ण १५ जिल्ह्यांच्या यादीत नाशिकचा समावेश झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. दहा वर्षांच्या सरासरी तापमानाची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ठेवली जाते. (Nashik inclusion in list of 15 hottest districts in state)

त्यानुसार महाराष्ट्राचे सरासरी तापमान ४१.७३ अंश सेल्सिअस इतके आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांच्या यादीत २० जिल्ह्यांचा पारा चाळीसच्या आत असल्याने त्यांना थंड जिल्हे संबोधले जाते. यात नाशिकचा समावेश होता. गेल्या दहा वर्षांत नाशिक जिल्ह्याचे सरासरी तापमान ३९.५४ अंश सेल्सियस राहिले आहे.

परंतु, यंदा एप्रिलमध्येच नाशिकचा पारा चाळिशी पार गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. असह्य उकाडा जाणवत असल्याने भर दुपारी घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत नाशिककरांसाठी अजून एक वाईट बातमी आहे. सातत्याने चाळिशी पार होणाऱ्या जिल्ह्यांचा ‘हॉट’ जिल्ह्यांच्या यादीत समावेश होतो.

विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांचा पारा सरासरी ४० ते ४५ च्या वर राहिला. त्यात नाशिकचा समावेश झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन, आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मार्गदर्शन केले जाते. नाशिकचा पारा ४० अंश सेल्सियसवर गेल्याने नागरिक आजारी पडू नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे. (latest marathi news)

नागरिकांनी दुपारी बारा ते तीन या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जाते. परंतु, नाशिकचा पारा इतक्या झपाट्याने वाढल्याने सर्वजण हैराण झाले आहेत. दुपारी असह्य उकाडा जाणवत असल्याने सायंकाळी पावसाचे वातावरण तयार होते. पाऊसही कधी पडतो तर कधी नाही, त्यामुळे वातावरणात कमालीचा उकाडा जाणवतो.

नाशिककरांना या वातावरणाची अनुभूती मेमध्ये येते. पारा चाळिशी पार गेल्याने नाशिक आता थंड राहिलेले नाही, याविषयी नागरिक आता उघडपणे बोलत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार नाशिकने गेल्या दहा वर्षांची सरासरी ओलांडल्याने राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत जिल्ह्याचा समावेश झाला आहे. पुढील वर्षाच्या अहवालात त्याची नोंद होईल.

१४ तालुक्यांचा पाराही वाढला

उष्णतेच्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश होत असताना जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा पाराही वाढला आहे. १४ तालुक्यांतील तब्बल ५२ महसूल मंडळांमधील गावांमध्ये असह्य उकाडा जाणवत असल्याने या ठिकाणी प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.

गुरुवारी पारा अंशतः घसरला

नाशिक शहराचे तापमान बुधवारी (ता. २२) ४२ अंशांवर गेल्याने विक्रमी तापमानाची नोंद झाली. या तुलनेत गुरुवारी (ता. २३) पारा काहीसा कमी होऊन ४१.२ अंश सेल्सियसपर्यंत कमी झाला. थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला; परंतु दुपारी असह्य उकाडा जाणवतच होता.

दहा वर्षांतील तापमानाची सरासरी

जिल्हा.........तापमान (अंश सेल्सियस)

नाशिक...........३९.५४

नंदुरबार.............४२.३५

जळगाव........४३.२३

अकोला.......४४.१२

धुळे.......४१.८९

भंडारा..........४४.२६

अमरावती..........४४.२८

बुलढाणा........४४.३५

वर्धा...........४४.९३

वाशीम.........४४.६३

यवतमाळ..........४५.५३

चंद्रपूर.........४५.३१

गोंदिया......४५.०१

लातूर...........४३.४१

नागपूर...........४४.१२

नांदेड...............४१.२६

कोट

"नाशिकचा पारा सातत्याने वाढत असल्याने राज्यातील अतिउष्ण जिल्ह्यांच्या यादीत आता नाशिकचा समावेश होईल. पुढील वर्षी राज्याच्या अहवालात त्याचा समावेश होऊ शकतो." - श्रीकृष्ण देशपांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT