मनमाड : युनियन बँकेचे एफडी घोटाळा प्रकरण गाजत असतानाच मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोठ्या उद्योगपतीच्या कार्यालय व घरावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून, विविध चर्चेला उधाण आले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका उद्योगपतीच्या घरावर आणि कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. (Income Tax Department raids businessman of Manmad)
सकाळपासून प्राप्तिकर विभागाच्या गाड्या उद्योगपतीच्या कार्यालय व घरासमोर उभ्या होत्या. या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात होता. प्राप्तिकर विभागाकडून सकाळपासून तपासणी सुरू आहे. छापा टाकण्यात आलेल्या मनमाडच्या या उद्योगपतीचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. (latest marathi news)
याच उद्योगपतीच्या नाशिक येथील फर्मवरही छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या छाप्याबाबत प्राप्तिकर विभागाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. मात्र या कारवाईमुळे व्यापारी, उद्योगपतींनी चांगलाच धसका घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.