Dengue Sakal
नाशिक

Nashik Dengue News : डेंगीच्या दंडात दुप्पट वाढ! नागरिकांना 500, बिल्डर्सला 10 हजार रुपये

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dengue News : शहरात डेंगीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतं असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय व मलेरिया विभागाने निर्मूलनाची चळवळ हाती घेतली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पावणेदोनशे पथकाकडून डेंगी उत्पत्तीची साधने शोधताना बेजबाबदारपणा आढळून येत असल्याने दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. निवासी भागात आता प्रतिस्पॉट दोनशेऐवजी पाचशे रुपये, तर बांधकामाच्या साइटवर पाचऐवजी दहा हजार रुपये अशी दंडात्मक कारवाई हाती घेतली जाणार आहे. (increase in dengue case in city 500 to citizens)

शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंगीचे रुग्ण आढळून येत आहे. डेंगीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागील आठवड्यात केंद्रीय समितीने महापालिका क्षेत्रात भेट दिली होती. समितीलादेखील डेंगी उत्पत्तीची स्थळे आढळून आल्याने महापालिकेने उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यात वैद्यकीय विभागाकडून १७५ पथकांची निर्मिती पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे. पथकामार्फत घर भेटी देऊन डास उत्पत्ती स्थळे शोधली जात आहे. मागील तीन दिवसांमध्ये ४९२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

त्यांच्याकडून प्रतिस्पॉट दोनशे रुपये याप्रमाणे १ लाख १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. दंड वसूल करण्यात महापालिकेला रस नाही. महापालिकेमार्फत डेंगी उत्पत्तीची स्थळे नष्ट केली जात असताना नागरिकांनीदेखील त्यास प्रतिसाद देऊन घराच्या परिसरातील डेंगी उत्पत्तीची स्थळे नष्ट करणे अपेक्षित आहे. मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवासी ठिकाणी प्रतिस्पॉट दोनशे रुपये दंड केला जात आहे. (latest marathi news)

मात्र त्यात आता वाढ करण्यात आली असून, पाचशे रुपयांपर्यंत प्रतिस्पॉट दंड केला जाणार आहे. बांधकाम व्यवसायिकांना प्रतिस्पॉट पाच हजार रुपये असा दंड सध्या आकारला जात आहे. त्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रतिस्पॉट दहा हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. गॅरेजमध्ये डेंगी उत्पत्तीची साधने आढळल्यास १ हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड केला जाणार आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये अळ्या

महापालिकेकडून डेंगी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी पथक नियुक्ती करण्यात आली असून, दोन दिवसात बारा हजार घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. यात ४९० नागरिकांना दंड ठोठावला आहे. मंगळवारी (ता. १६) मोहिमेमध्ये एका खासगी रुग्णाच्या पार्किंगच्या जागेत डेंगी अळी उत्पत्ती स्थाने आढळून आले. त्यामुळे रुग्णालयाला पाच हजार रुपयांच्या दंड ठोठावला, तर गंगापूर रोडवरील सुप्रिम फॉर्च्यून डेव्हलपर्स बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी डेंगी उत्पत्तीची साधने आढळल्याने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT