Nashik Dengue Update : शहरात डोळ्यांची साथ सुरू असताना आता डेंगीच्या आजारानेदेखील तोंड वर काढले आहे.
आठ दिवसात पंचवीस नवीन रुग्ण आढळून आले आहे. डेंगी रुग्णांची संख्या आता १७३ वर पोचली आहे. (Nashik Increase in number of dengue patients 25 new patients)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पावसाने ओढ दिल्याने डेंगी रुग्णांची संख्या वाढतं असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जूनअखेर शहरात डेंगीचे ११६ रुग्ण होते. जुलैत ३२ रुग्ण आढळले. ऑगस्ट महिन्यात २५ रुग्णांची नोंद झाली. शहरातील डेंगीचा आकडा १७३ वर पोचला आहे.
दरम्यान, शहरात डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून ते नष्ट करण्यासाठी ६० आरोग्य पथके नियुक्त करण्यात आले आहे. पथकांच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे.
पावसाचे पाणी साठू देऊ नये. पाणी साचल्यास त्यात काळे ऑइल टाकावे. कारंजा, पडीक विहीर, कमळ कुंडी, यामध्ये गप्पी मासे सोडवावेत. सेप्टिक टँक पूर्णपणे बंदिस्त कराव्यात. व्हेंट पाईपला जाळी बांधावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.