patients  esakal
नाशिक

Nashik News : मालेगावी साथ रूग्णांच्या संख्येत वाढ! वातावरण बदलामुळे परिणाम

Nashik News : पावसाळ्यात यंदा शहरात एक पाऊस सोडला तर दमदार पाऊस झाला नाही. वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : पावसाळ्यात यंदा शहरात एक पाऊस सोडला तर दमदार पाऊस झाला नाही. वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे येथे अंगदुखी, सर्दी, खोकला, ताप, मलेरिया, डेंगी, पिवळी कावीळ, निमोनिया, डायरिया यासह अनेक आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिका व खासगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी आहे. अनेक रुग्णालये हाऊसफुल आहेत. (Nashik News)

शहरात दमदार पाऊस झाला नाही. दिवसभर ऊन, सावलीचा खेळ सुरु असतो. त्यातच डासांमुळे नागरिक त्रस्त आहेत. येथे गेल्या आठ दिवसापासून विविध आजारांची साथ दिसून येत आहे. विशेषत: लहान मुलांच्या दवाखान्यात मोठी गर्दी आहे. लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप, निमोनिया, मलेरिया, डेंगी व डायरिया आदी आजारांनी त्रस्त केले आहे.

लहान मुलांना बरोबरच वृद्धांना दमा, मधुमेहाचा त्रास वाढला आहे. सामान्य रुग्णालयात ओपीडी रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढल्याचे सांगण्यात आले. येथील सामान्य रुग्णालय, हारून अन्सारी रुग्णालय, मोसम चौकाजवळील महिला व बाल रुग्णालय, कॅम्प भागातील रुग्णालय आदी महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात नेहमीपेक्षा रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

शहरात अनेक भागात गटारींची स्वच्छता वेळेत केली जात नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना डासांचा सामना करावा लागत आहे. येथे अनेक भागात पाणी साचत असल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. हिवतापाच्या रुग्ण रुग्णात वाढ होत आहे. महापालिकेने डास प्रसिद्ध प्रतिबंधक औषधांचे फवारणी करावी अशी मागणी देखील होत आहे. (latest marathi news)

अशी घ्यावी काळजी.

नागरिकांनी लहान मुलांना बाहेरचे तेलकट व पाकीट बंद असलेली पदार्थ खाण्यासाठी देऊ नये. पाणी देताना उकळून द्यावे. नेहमी बाहेर पडताना मस्कचा वापर करावा. स्वच्छ पाणी जास्त दिवस साचून ठेवू नये. या पाण्यात डेंग्यूचे डास तयार होतात. रात्री झोपताना मच्छरदाणी, मच्छर मारणाऱ्या औषधांचा वापर करावा. तसेच मुलांना थंड पाणी देऊ नये. डेंगू व इतर आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित मुलांना डॉक्टरांकडे दाखवून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

"शहरात रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. यात महिला व लहान मुलांची संख्या मोठी आहे. पालकांनी मुलांना बाहेरचे पदार्थ खाण्यास देऊ नयेत. मधुमेह व दमा असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. खोकला आल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखवावे." - डॉ. शरद शिरोळे, बालरोगतज्ज्ञ - मालेगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार-मंत्री झालोच नसतो'; असं का म्हणाले मुश्रीफ?

"त्याने त्याच्या मुलाला एक फोन केलेला नाही" ; 'इस प्यार को..'फेम अभिनेत्रीचा एक्स नवऱ्यावर आरोप, म्हणाली...

Dhule City Assembly Constituency : अनिल गोटे शिवबंधनात; ठाकरेंनी दिला एबी फॉर्म! मातोश्रीवर प्रवेश; धुळे शहराची उमेदवारी

Donald Trump Vs Kamala Harris: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अटीतटीची

कलर्सच्या नव्या मालिकेचं प्रसारण रखडलं; प्रेक्षकांनी रोष व्यक्त करताच वाहिनीने मागितली माफी, पोस्ट करत लिहिलं-

SCROLL FOR NEXT