Increase in Onion Export Duty esakal
नाशिक

Onion Export: निर्यात शुल्क वाढीमुळे कांद्याची वाताहत! बांगलादेश, नेपाळ, श्रीलंकेवर अवलंबून राहण्याची वेळ; परकीय चलनावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : परदेशात निर्यात होणाऱ्या कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात शुल्क लागू केल्यापासून निर्यात मंदावली आहे. निर्यात शुल्क भरणे व्यापाऱ्यांना परवडत नसल्याने भारताला आता शेजारी देशांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. यामुळे परकीय चलनावरही परिणाम झाल्याचे निर्यातदार संघटनांनी म्हटले आहे. (increase in onion export duty)

भारतातून उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. यात प्रामुख्याने बांगलादेश, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका व युरोप अरब अमिराती (यूएई) या देशांना सर्वाधिक कांदा पुरवला जातो. मात्र, बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यामुळे कांद्यासह इतर शेतमालाची निर्यात रोडावली आहे.

बांगलादेशला निर्यात होणाऱ्या कांद्यापैकी सर्वाधिक फटका हा नाशिकच्या कांद्याला बसला आहे. अर्थात, अडकलेले ट्रक सुरळीतपणे निघाले आहेत. पण, निर्यातीबाबत व्यापाऱ्यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. भारतातून बांगलादेशला ४० टक्क्यांवर कांद्याची निर्यात होते.

त्यामुळे भारताला परकीय चलन मिळवून देण्यात बांगलादेशचा सर्वाधिक वाटा राहिला आहे. केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी कांद्यावर ४० टक्के (१९ रुपये प्रती किलो) निर्यात शुल्क लागू केले. व्यापाऱ्यांना हे शुल्क अगोदर जमा केल्यानंतरच निर्यातीची परवानगी दिली जाते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने ४ मे २०२४ रोजी कांदा निर्यातबंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण, त्याला निर्यात शुल्क (४० टक्के) व किमान निर्यात मूल्य (६५०० प्रतिक्विंट) लागू केले. म्हणजे साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमी दराने निर्यात करण्यास बंदी घालण्यात आली.

भारतात तीन हजार रुपये प्रतिक्विंटलने खरेदी केलेला कांदा किमान साडेसहा हजार रुपयांपेक्षा जास्त दरानेच निर्यात करण्याची अट घातल्यामुळे भारताच्या कांद्याची मागणी कमी होत आहे. निर्यातीबाबतच्या धरसोड वृत्तीमुळे व्यापारी आखाती देशांपेक्षा सिमेलगतच्या देशांना कांदा पाठवत असल्याचे गेल्या काही वर्षांमधील निर्यातीवरुन दिसून येते. (latest marathi news)

२०२३-२४ मध्ये भारतातून बांगलादेश, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका व यूएई या प्रमुख पाच देशांना १३ लाख ६७ हजार मे.टन कांदा पाठवला. त्यातून देशाला तीन हजार २९ कोटी रुपये मिळाले. तर २०२२-२३ मध्ये एक लाख ९१ हजार मे. टन कांदा निर्यातीतून तीन हजार २५० कोटी रुपये मिळाले होते. इतर देशांना फार कमी कांदा पाठवण्यात येतो. त्यामुळे निर्यातीसाठी भारताला आता शेजारी देशांवरच अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

"कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने निर्यात शुल्क लागू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यात घटली आहे. कमी वाहतूक खर्चामध्ये बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका येथे कांदा पोहोचवला जातो. परिणामी, भारताला जागतिक बाजार पेठ मिळत असताना केवळ जवळच्या देशांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे."- भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना

भारतातून कांदा निर्यातीचे प्रमुख देश (२०२३-२४)

देश....चलन (कोटी रु.).....निर्यात (मे.टन)

बांगलादेश......१५५५.................७ लाख २४ हजार

मलेशिया.........५४६..................२ लाख

श्रीलंका..........४१३..................१ लाख ७३ हजार

युएई.............३६१..................१ लाख ८४ हजार

नेपाळ...........१५०..................८४ हजार

एकूण............१३ लाख ६७ हजार....३०२९ कोटी

….२०२२-२३

बांगलादेश......८९७.................६ लाख ७१ हजार

मलेशिया.........८४८..................३ लाख ९३ हजार

श्रीलंका..........४५१..................२ लाख ७० हजार

युएई.............७८४..................४ लाख ३ हजार

नेपाळ...........२६७..................१ लाख ७५ हजार

एकूण............१लाख ९१ हजार....३२५० कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Violence: अकोल्यात तणाव! दोन गटात राडा, जमावाने दगडफेक करुन कार पेटवल्या

Rahul Gandhi Video: दलितांच्या घरात काय बनतं? राहुल गांधींनी जाणून घेतली खाद्यसंस्कृती, कोल्हापुरात स्वतः बनवलं जेवण

Raj Thackeray: "राजकारण्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरुन उड्या मारायला लावल्या पाहिजेत"; राज ठाकरेंचा घणाघात

Stock Market Crash: चार राज्यातील विधानसभेत भाजपचा पराभव झाला तर शेअर बाजाराचे काय होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

भारताला जिम्नॅस्टीक्सचं वेड लावणाऱ्या Dipa Karmakar ची निवृत्ती; गाजवलेलं रिओ ऑलिम्पिक

SCROLL FOR NEXT