Nashik News : नाशिककरांची प्रवास वाहिनी समजली जाणारी पंचवटी एक्स्प्रेसच्या चाकरमानी महिला आता समस्या सुटेपर्यंत काळ्याफिती लावून प्रवास करणार आहे. नोकरीनिमित्त रोज मुंबईला प्रवास करणाऱ्या महिलांच्या डब्यामध्ये दररोज समस्यांचा डोंगर उभा राहत आहे. सुविधा मिळत नसल्याने महिला प्रवासी त्रस्त असून अनेकदा तक्रार करुनही याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप चाकरमानी महिलांनी केला आहे. (Panchavati Express)
नाशिककरांना ४८ वर्षापासून पंचवटी एक्स्प्रेस सेवा देत आहे. या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या आरक्षित डबे आहे. या आरक्षित डब्यामध्ये मनमाड पासून तर थेट कल्याण पर्यंत पुरुषवर्ग प्रवास करतो. त्यामुळे महिलांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. शिवाय डब्यामधील स्वच्छता गृहात पाणी नसते. अनेक वेळा लाइट बंद असते.
रेल्वे पोलिस आणि आरपीएफ महिलांच्या डब्याकडे लक्ष देत नाही. अनेक वेळा रेल्वेला निवेदने देऊनही रेल्वेने आत्तापर्यंत दाखल घेण्यात आलेली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोज डबा काही ठिकाणी गळत आहे. (latest marathi news)
त्यामुळे मनमाड नाशिकच्या महिला या सर्व गोष्टींना वैतागले आहे. त्यामुळे समस्या सुटत नाही. समस्या सुटत नाही तोपर्यंत काळ्याफिती लावून प्रवास करणार असल्याचे महिलांनी सांगितले.
"नाशिककरांच्या हक्काच्या गाड्यांची पळवापळवी तर होतेच आहे. पण जी पंचवटी एकमेव गाडी नाशिकरांसाठी मुंबईला जाण्यासाठी सोयीची आहे. त्यात ही प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. महिलांच्या राखीव डब्यात पुरूषांची गर्दी असते. डब्ब्यात अस्वच्छता मोठ्याप्रमाणात असते.कल्याण वरून मोठ्या प्रमाणात लोकल टिकीट महिलांचा प्रचंड त्रास नाशिक महिलांना होतो." - उज्ज्वला कोल्हे, रेल्वे वेलफेअर असोसिएशन सदस्य.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.