Nashik News : इंडिगो एअरलाइन्स कंपनीतर्फे नाशिकमधून देशभरातील तीस महत्त्वाच्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्यात आल्यानंतर आता दक्षिण भारताचे महत्त्वाच्या बेंगळुरू शहराला जोडणारी हवाईसेवा सुरू करण्याचा निर्णय इंडिगो कंपनीने घेतला आहे. १० सप्टेंबरपासून सेवा सुरू होईल. (Indigo Airlines Bangalore in 2 hours from Nashik)
इंडिगो कंपनीने नाशिकसाठी विमानसेवेचे नवीन शेड्यूल जाहीर केले. यात उत्तर गोवा, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, इंदूर या देशातील प्रमुख शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू आहे.
आता नाशिक ते बेंगळुरूसाठी १० सप्टेंबरपासून सेवा सुरू होईल. बेंगळुरूवरून दुपारी अडीचला विमानाचे उड्डाण होईल. (latest marathi news)
दुपारी चार वाजून २० मिनिटांनी नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन होईल. नाशिकहून चार वाजून ५० मिनिटांनी उड्डाण होईल.
सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी पोचेल, अशी माहिती निमा एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.