CM Eknath Shinde esakal
नाशिक

Nashik Industry News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ‘उद्योगभरारी'

Latest Nashik News : गुरुवारी (ता. ३) येथील त्र्यंबक रोडवरील डेमॉक्रसी हॉटेलमध्ये उद्योगभरारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतलेले निर्णय, उद्योजकांना दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा आणि औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आली आहे.

उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीत भरारी घेत प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा उद्योग विभागाने केला आहे. याचसाठी गुरुवारी (ता. ३) येथील त्र्यंबक रोडवरील डेमॉक्रसी हॉटेलमध्ये उद्योगभरारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Industrial program today in presence of CM)

यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे व प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली.

आतापर्यंत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लहान आणि मोठ्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागतच आहे. राज्याच्या उद्योगस्नेही धोरणामुळे उद्योगवाढ झपाट्याने होताना दिसत आहे. उद्योगासाठी घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण माहिती उद्योगभरारी कार्यक्रमात दिली जाणार आहे.

यामुळे उद्योजकांनी तसेच नवउद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन एमआयडीसी विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाने अनेक नववसाहती स्थापना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे, त्यातील मालेगाव, अजंग, येवला, सिन्नर, विंचूर, दिडोरी, पेठ या ठिकाणी नवीन वसाहतींच्या पहिल्या व दुसऱ्या टप्पातील भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे.

त्यातील काहींनी भूखंड घेऊन फक्त पडून ठेवले आहेत, तर काहींनी एमआयडीसी विभागाकडून परवानगी घेऊन बांधकामाला सुरुवात केली आहे. काहींनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेत आपले उद्योग थाटले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT