Armyworm seen on maize crop in Shiwar here. esakal
नाशिक

Nashik News : मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; देवळा तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंता

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कसमादेतील काही भागात यावर्षीही मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. खते, बियाणे, मजुरीची रक्कम देण्याआधीच किटकनाशकांची खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कसमादेच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामाची लगबग चालू आहे. त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांनी मकाचे पीक घेतले आहे. कारण पुढील पीक घेण्याच्या दृष्टीने हे नियोजन असते. (Infestation of armyworm on maize crop is concern among farmers in Deola taluka )

अशी पिके शेतात डोलू लागली असतांनाच पानांवर आणि पोग्यात लष्करी अळी दिसू लागल्याने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. यापूर्वीही असेच आक्रमण झाल्याने मक्याचे नुकसान झाले होते. जोरात पाऊस पडल्यावर या अळीचा नायनाट होत असतो. परंतु, येथील भागात सध्या तसा जोराचा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ आली आहे. (latest marathi news)

या अळीचे प्रमाण सध्या थोडे कमी असले तरी त्याचा प्रसार वेगाने होत असल्याने शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. देवळा तालुक्यात या अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. ही अळी पोग्यात अंडी घालून मका पिकाची पाने कुरतडत असते. यामुळे पिकाची वाढ खुंटत जाऊन मोठी हानी होते. पीक विरळ होऊन उत्पादन घटते.

''अद्याप मका बियाणे आणि खतांचे पैसेही दिले नाहीत तेवढ्यात मका पिकावर लष्करी अळी दिसू लागली आहे. मोठा पाऊस नसल्याने अळीचा प्रादुर्भाव वाढता आहे. महागाची खते, बियाणे, मजुरी सहन करत खरीप हंगामातील मका पिकावर या रोगाचे आक्रमण झाल्याने पुन्हा फवारणीसाठीचा खर्च वाढला आहे.''- किरण भामरे, खुंटेवाडी (ता. देवळा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT