Gajanan Kade while sharpening the scythe, the axe esakal
नाशिक

Nashik Innovative Ideas: विळी, कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी देशी जुगाड! रोजगारासाठी अनोखी शक्कल; दुचाकीवर बसविले जनरेटर

Nashik News : निजामपूर-नंदुरबार येथील व्यावसायिकाला त्यातून चांगला मोबदला मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नरकोळ : स्वयंपाकगृह, हॉटेल, खाद्यपदार्थांच्या ठेल्यांमध्ये चाकूचा, सलून, टेलर, मेडिकल, पानटपरी दुकानात कैचीचा, सुपारी फोडण्यासाठी अडकित्ते आणि गवत कापण्याकरिता लागणाऱ्या विळी, कुऱ्हाड, कैचीला धार लावण्यासाठी व्यावसायिक थेट खेड्यात दाखल झाले आहेत.

त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाला. दुचाकीवर जनरेटर बसवून अनोखी शक्कल लढवत रोजगाराचा प्रश्‍न सोडविला आहे. निजामपूर-नंदुरबार येथील व्यावसायिकाला त्यातून चांगला मोबदला मिळत आहे. (Nashik Innovative Ideas generator mounted on bike marathi news)

सातत्याने वापर होत असल्याने चाकू, कैचींची धार बोथट होते. त्यांना वारंवार धार लावावी लागते. पूर्वी चाकू, कैचींना धार लावणारे बाजारात, मोहल्ल्यात फिरत. त्यासाठी स्वयंचलित यंत्र असायचे. लाकडी किंवा लोखंडी ढाचामध्ये सायकलची रिंग बसवून ती गरागरा फिरवत. त्या वेगावर फिरणाऱ्या दगडी चाकावर धार लावली जात.

परंतु, बदलत्या काळानुसार आता मोटरसायकलवर जनरेटर बसवून कारागिर धार लावण्यासाठी गावोगावी फिरत आहे. धार लावली गेली की ग्राहकांकडून योग्य मोबदला दिला जातो. काहींनी टेक्नॉलॉजिचा उपयोग करीत सायकलवरच यंत्र तयार केले. सायकलच्या रिंगचा आधार घेत पॅडल मारून चाकाला वेग देत आणि त्या गतीवर चाकूंना धार लावली जात आहे.

कमी भांडवलात सुरू होणाऱ्या या व्यवसायावर अनेकांची रोजीरोटी चालत. आता पुढच्या पिढीने व्यवसाय सांभाळल्याने दुकानांमध्ये विजेवर चालणाऱ्या यंत्रांचा वापर केला जात आहे. ग्रँडरवर काम केले जाते. फिरत्या चाकावर चाकूंना धार लावणे कठीण काम आहे. (Latest Marathi News)

कसे असते जनरेटरवर धार लावणे

जनरेटर मशिनवर एक मोटार असते. त्या मोटरीला पुली बसवलेली असून, त्यावरील व्हीलला दगडी ग्रॅनेटर लावलेले आहे. दगडी ग्रॅनेटर बाराशे रुपयांना मिळते. एका ग्रॅनेटरवर पाचशे ते सहाशे विळी, कुऱ्हाडींची धार लावली जाते. एक लिटर पेट्रोलमध्ये दीडशे वेळा कुऱ्हाड, कोयत्यांना धार लावण्यात येते.

असा आहे धार लावण्याचा दर

चाकूना : १० ते १५ रुपये

लहान कैची : २० रुपये

विळी, कुऱ्हाड : ३० रुपये

"विळी, कुऱ्हाडींना धार लावण्याचा पारंपारिक व्यवसाय असून, यावरच आमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. आदिवासी पट्ट्यात कुऱ्हाड, विळींना आवर्जून धार लावतात."

- गजानन काकडे, निजामपूर-नंदुरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT