Simhastha Kumbh Mela esakal
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela: रिंगरोडच्या ‘मिसिंग लिंक’ जोडणार; सलग दुसऱ्या दिवशी सिंहस्थातील प्रस्तावित कामांची पाहणी

Simhastha Kumbh Mela: २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात तयार करण्यात आलेल्या अंतर्गत रिंगरोडला जोडणारे मिसिंग लिंक प्रामुख्याने जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Simhastha Kumbh Mela : २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात तयार करण्यात आलेल्या अंतर्गत रिंगरोडला जोडणारे मिसिंग लिंक प्रामुख्याने जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्या मिसिंग लिंकची पाहणी शुक्रवारी (ता. ७) करण्यात आली. त्याचबरोबर सिता सरोवराचे सौंदर्यीकरण व सिंहस्थाच्या निमित्ताने कायमस्वरुपी पार्किंग तयार केली जाणार आहे. (Inspection of proposed work in Simhastha for second consecutive add missing link of ring road )

२०२६-२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरणार आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने ११ हजार ११७ कोटींचा विकास आराखडा तयार केला. त्याचबरोबर ५ हजार कोटी रुपये हे भूसंपादन व रिंगरोडसाठी खर्च केले जाणार आहे. त्यामुळे जवळपास १७ हजार कोटींच्या वर आराखडा पोचला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या शिखर समिती समोर आराखडा सादर केला जाणार आहे.

त्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने सिंहस्थ आराखड्याची छाननी करण्याच्या सूचना दिल्या. मागील सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये २२०० कोटी रुपये आराखडा तयार केला होता. यात १०५७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जवळपास १७ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आल्याने आराखड्यात सुचविण्यात आलेल्या कामांची व्यवहार्यता तपासण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.

त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी आराखड्यात सुचविण्यात आलेल्या कामांची छाननी सुरू केली आहे. गुरुवारी (ता. ६) रामकुंड व परिसराची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर शाही मार्ग, काळाराम मंदिर परिसर, लक्ष्मी नारायण पुल, लक्ष्मण झुला, तपोवन एसटीपी, साधूग्राम, साधूग्राममधील कमान, तपोवन बस डेपो, शाही मार्गावरील अतिक्रमणे आदींची आयुक्तांनी पाहणी केली. (latest marathi news)

त्यापाठोपाठ शुक्रवारी (ता. ७) सीता सरोवर, रिंग रोडला जोडणारे मिसिंग लिंक, पार्किंग आदी जागांची पाहणी केली. या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, सचिन जाधव, जितेंद्र पाटोळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. तानाजी चव्हाण, घनकचरा संचालक डॉ. आवेश पलोड, अग्निशमन अधिकारी संजय बैरागी आदी उपस्थित होते.

अहवाल सादरच्या सूचना

२०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने अंतर्गत रिंग रोड तयार करण्यात आले. जवळपास नव्वद किलोमीटरचा रिंग रोड तयार झाले. रिंगरोडमुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न बहुतांशी मिटला. शहराच्या मध्यवर्ती भागात होणारे वाहतूक कोंडी यानिमित्ताने कमी झाली. मात्र आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने अंतर्गत रिंगरोडला जोडणारे मिसिंग लिंक विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने रस्त्यांची पाहणी करण्यात आली. व सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्त करंजकर यांनी दिल्या.

पार्किंग विकसित करणार

मागील सिंहस्थ कालावधीमध्ये शहराच्या प्रवेशद्वारावर बारा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. येणाऱ्या सिंहस्थातदेखील पार्किंग संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास २२ लाख लोकसंख्या व अकरा टक्के वाहने वाढल्याचा अंदाज प्रशासनाचा आहे. त्याअनुशंगाने अठरा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होईल. त्या जागांची पाहणी आज करण्यात आली. सीता सरोवराचीदेखील पाहणी करण्यात आली. येथे सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना दिल्या.

''सिंहस्थाच्या निमित्ताने कायमस्वरुपी विकासकामे करण्याच्या दृष्टीने रिंगरोडला जोडणारे मिसिंग लिंक विकसित होणे गरजेचे आहे. त्याअनुशंगाने रस्ते विकासाचे नियोजन आहे.''- डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT