Crowd at Ambad Police Station.  esakal
नाशिक

Nashik News : अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक नजन यांनी आदल्या दिवशीच दिली होती घटनेची ‘हिंट’

Nashik News : अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक नजन यांनी डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल्याची केल्याची घटना मंगळवारी (ता. २०) सकाळी घडली.

सकाळ वृत्तसेवा

सिडको : अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक नजन यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. २०) सकाळी घडली. यासंदर्भात त्यांच्यासोबत असणाऱ्या रायटरला त्यांनी आदल्या दिवशी चर्चा करत असताना कार्यालयात उशिराने येण्यास सांगितले होते.

यावरून त्यांच्या मनात आधीच आत्महत्येचा विचार तर नसेल ना असाही कयास बांधण्यात येत आहे. तर पत्नी सातत्याने आजारी असल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा विचार केला असावा, असेदेखील बोलले जात आहे. असे असले तरी त्यांच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्टपणे समजणे अवघड आहे. (Nashik Ambad Police Station Inspector shot himself case marathi news)

पोलिस निरीक्षक अशोक निवृत्ती नजन (४८, रा. इंदिरानगर, नाशिक) यांनी मंगळवारी सकाळी पोलिस ठाण्यात त्यांच्या कार्यालयात सकाळी सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. आदल्या दिवशी म्हणजे शिवजयंतीच्या रात्री त्यांनी कर्मचारी पवन परदेशी यांच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या.

परंतु दुसऱ्या दिवशी ते असे काही करतील असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. नजन यांनी यापूर्वी नगर, मालेगाव पोलिस ठाणे तसेच जात पडताळणी विभाग, नाशिक आदी ठिकाणी काम केले होते. पोलिस ठाण्याच्या आवारात अंमलदारांची हजेरी सुरू होती.

त्यानंतर हवालदार शरद झोले हे हजेरीचा अहवाल देण्याकरिता नजन यांच्या कार्यालयात गेले असता, त्यांना नजन यांच्याकडे बघून त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा असे प्रथमदर्शनी वाटले. मात्र नंतर त्यांच्या नाकातून रक्त येताना त्यांना दिसले. झोले यांनी तत्काळ इतर अंमलदारांना आवाज देवून बोलावले.

त्यानंतर सर्वांना नजन यांनी गोळी झाडल्याचे दिसून आले. नजन हे मूळचे वैजापूर येथील रहिवासी होते. ते १९९७ मध्ये उपनिरीक्षक पदावर पोलिस खात्यात कर्तव्यावर आले. जुलै २०२३ मध्ये त्यांची नियुक्ती अंबड पोलिस ठाणे येथे निरीक्षक पदावर झाली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांचा मुलगा सध्या नववीचे शिक्षण घेत आहे. (Latest Marathi News)

विविध प्रश्‍न उपस्थित

मंगळवारी पोलिस निरीक्षक नजन यांनी रात्री उशिरापर्यंत शिवजयंतीचा चोख बंदोबस्त केला. त्यांनी रात्री त्यांचे रायटर सूचित सोळुंके यांना सांगितले की, तुझ्या मुलाची तब्येत ठीक नाही. तू उद्या मुलाला घेऊन आधी दवाखान्यात जा. मला दुपारी काही काम आहे. मी काम आवरून आल्यावर तुला फोन करतो. तेव्हा तू पोलिस ठाण्यात ये, असे सांगितले होते.

त्यामुळे त्यांच्या मनात रात्रीपासून आत्महत्येचा विचार होता का, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलले तर त्यास कौटुंबिक कारण होते की त्यांना अन्य काही दबाव आला होता, असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. दरम्यान, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड हे कार्यरत असताना भाऊसाहेब सोनवणे या हवालदाराने अंबड पोलिस ठाण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

138 crore gold seized In Pune: पुण्यात सापडले घबाड! निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांनी जप्त केले 138 कोटींचे सोने; 'तो' टेम्पो कोणाचा?

Rajan Salvi : 'मविआचे 188 उमेदवार विजयी होतील, त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री आणि मी मंत्री होईन'

IPL 2025 Retention : काव्या मारनची एक 'खेळी' अन् Rishabh Pant, KL Rahul, Shreyas Iyer सह बंडाला पेटली 'मंडळी'!

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs NZ: नशीबानं संधी मिळाली अन् Mitchell Santner ने ७ विकेट्स घेत सोनं केलं; भारताविरुद्ध मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

SCROLL FOR NEXT