Adv. Godavari Devkate with her Teacher Krushna Mahale esakal
नाशिक

Inspirational Story : गुरू शिष्याची अनोखी कहाणी... ‘त्यांच्या’ अमूल्य पाठबळामुळे शाळाबाह्य 'ती' विद्यार्थिनी बनली वकील!

Nashik News : ॲड. गोदावरी राजाराम देवकाते या तरुणीने समाजापुढे प्रतिकूल परिस्थितीतून कशी मात करावी, असा आदर्श निर्माण केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

निखिल रोकडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्वतःचे घर नसताना रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर मिळेल त्या जागेत अनेक वर्ष राहून किमान गरजा भागवण्यासाठी पावलोपावली संघर्ष करून मनपा शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर एलएलबी पूर्ण करून वकील झाली. मात्र आपण शाळेत शिकत असताना ज्या शिक्षकाने आपल्याला पाठबळ व प्रोत्साहन दिले त्याला न विसरता समाज माध्यमांच्या व वैयक्तिक पातळीवर कृष्णा महाले या शिक्षकाचा शोध घेतला व त्यांची भेट घेऊन कृतज्ञ भावना व्यक्त केली. ॲड. गोदावरी राजाराम देवकाते या तरुणीने समाजापुढे प्रतिकूल परिस्थितीतून कशी मात करावी, असा आदर्श निर्माण केला आहे. (nashik Inspirational Story godavari devkate become lawyer news)

मनपा शाळा क्रमांक ११२ गोसावीवाडी येथे कृष्णा शंकर महाले उपशिक्षक म्हणून २००६ ला कार्यरत होते. तिसरीमध्ये गोदावरी नामक विद्यार्थिनी अभ्यासात हुशार होती, हे त्यांच्या लक्षात आले. श्री. महालेंनी तिची विचारपूस केली, त्याचदरम्यान त्यांना लक्षात आले की त्यांना राहण्यासाठी घर नाही.

रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर जिथे जागा उपलब्ध होईल तिथे या मायलेकी राहत होत्या व तेथेच अन्न मागायच्या. श्री. महाले यांनी गोदावरी शाळेत नियमित येण्यासाठी प्रोत्साहित केले. शाळेत लागणाऱ्या वस्तू व इतर काही आवश्यक बाबी तिला वेळोवेळी उपलब्ध केल्या.

काही वेळा श्री. महाले गोदावरीला आपल्या घरी ही घेऊन जात असत. तसेच तिला सहलीला आपल्या मुलांबरोबर घेऊन गेले. इतर मुला- मुलींना मिळणाऱ्या सुख सुविधांपासून ती वंचित राहू नये, असा त्यांचा त्यामागे उद्देश होता. गोदावरीला दहावीपर्यंत तक्षशिला विद्यालय देवळालीगाव येथे प्रवेश मिळवून दिला.  (latest marathi news)

त्यामुळे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. वारंवार तिच्या अभ्यासाबद्दल माहिती घेत राहिले. दहावी पास झाल्यानंतर मात्र गोदावरी व श्री. महाले यांचा संपर्क तुटला. त्याच दरम्यान गोदावरी दहावीनंतर एलएलबी पूर्ण करून वकीलही झाली.

मात्र तिच्या मनातही आपल्या शालेय जीवनात ज्या शिक्षकांकडून प्रोत्साहन व पाठबळ मिळाले त्यांना भेटण्याची प्रबळ इच्छा होती. म्हणून तिने त्या शिक्षकाचा शोध सुरू केला. यासाठी सर्वप्रथम फेसबुक व त्यानंतर मखमलाबाद परिसरातील मनपा शाळेत जाऊन तेथील शिक्षकांकडून महाले यांचा मोबाईल नंबर मिळवला व त्यांची भेट घेऊन कृतज्ञभाव व्यक्त केला.

"शाळाबाह्य उपक्रमांतर्गत आम्ही समुपदेशन करतो व त्यातूनच एखाद-दुसरा विद्यार्थी भविष्यात त्याच्या कर्तृत्वाने मोठा घडतो. मी माझे काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. त्यात गोदावरी यशस्वी झाली. असेच प्रयत्न सर्वांनी करणे अपेक्षित आहे."

- कृष्णा शंकर महाले, शिक्षक, मनपा शाळा

'कृष्णा महाले सरांमुळे शिक्षणाची आवड व प्राथमिक शिक्षण माझे पूर्ण झाले. त्यामुळेच मला वकिली पदवी संपादन करता आली. समाजातील प्रत्येक घटकांनी जे शिक्षणापासून वंचित आहे, त्यांना पाठबळ व प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे."- गोदावरी राजाराम देवकाते, वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT