Aboli Sunilkumar Patil esakal
नाशिक

Inspirational Story : खचलेल्या मनांना उभारी देणारी ‘अबोली’

विजयकुमार इंगळे

नियतीनं कुटुंबाभोवती आवळलेला पाश कल्पनेपलीडचा... आईसह आपल्या बहिणीसोबत आयुष्य जगत असताना कुटुंबाला परिस्थितीनं खाईत ढकललं होतं...पंधरा वर्षांपासून परागंदा झालेल्या वडिलांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं, मात्र वडील मात्र भेटू शकले नाहीत.

या काळात कुटुंबासमोर आलेली संकटं विचारांच्या पलीकडची होती... आईसह दोघा बहिणींवर उपासमारीची वेळही आली... मात्र अशाही परिस्थितीत मंदिरामध्ये मिळणारा महाप्रसादाचा आधार त्यांच्यासाठी मोलाचा होता. कुटुंबावर आलेल्या संकटांना तिनं संधी मानून शालेय शिक्षणापासूनच हार मानली नाही अन्‌ प्रत्येक अडचणीवर मात करत इंटेरियर डिझायनर म्हणून स्वतःची ओळख उभी केली ती नाशिकच्या अबोली पाटील हिने. (Inspirational Story of interior designer Aboli patil)

अबोली सुनीलकुमार पाटील... सध्याचे वास्तव्य नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील... शिक्षण बी.कॉम., इंटेरियर डिझायनर... वडील सुनीलकुमार पाटील यांचे पत्नी अनिता यांच्यासह सायली व अबोली या दोन मुली असलेलं चौकोनी कुटुंब... मूळचे चांदवड तालुक्यातील रहिवासी असलेल्या परिवाराची परिस्थिती जेमतेम...

नाशिकचा वेगाने वाढणारा विस्तार आणि संधी ओळखून पाटील परिवाराने नाशिक गाठलं... अंबड येथील खासगी कंपनीत नोकरी करत असलेले पाटील परिवाराला पुढे नेत असतानाच नियतीनं मोठं दुःख परिवाराला दिलं. सायली व अबोलीच्या जन्मानंतर कुटुंबाला चांगले दिवस येतील असे वाटत असतानाच कुटुंबावर आर्थिक डोंगर कोसळला.

त्यातच सुनील पाटील यांच्या आजारपणामुळे कुटुंब अडचणीत सापडलं. त्यातच नोकरी सुटल्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत होतं. त्यातच कुटुंबाने औरंगाबाद गाठलं... औरंगाबादमध्ये मिळेल ते काम करत असतानाच पत्नी अनिताही कुटुंबाला साथ देत होत्या. परिस्थिती एक ना एक दिवस बदलेल या आशेवर कुटुंबाचे प्रयत्न सुरू होते.

मात्र औरंगाबादमध्ये जम न बसल्यामुळे कुटुंबानं पुन्हा आपलं बिऱ्हाड नाशिकला हलवलं. त्या वेळी सायली दहावीत, तर अबोली आठवीत शिक्षण घेत होती. याच काळात कुटुंबावर मोठा आघात झाला. अबोलीचे वडील सुनीलकुमार कुटुंबातून अचानक बेपत्ता झाले. अबोली आणि सायली मुळातच अभ्यासात हुशार होते, मात्र कुटुंबावर ओढावलेल्या परिस्थितीत आईसोबतच मुलीही पडेल ते काम करत राहिल्या.

नवीन नाशिकच्या विजयनगर परिसरातील एका बंगल्याच्या आउटहाउसमध्ये राहून साफसफाईची कामे त्या करू लागल्या. आईला मदत करत असतानाच शालेय गरजाही ती आपल्या स्वकमाईतून पूर्ण करत होती. अबोली दहावीत असताना आईला कावीळ झाली. त्यामुळे शिक्षण सांभाळतानाच एका हॉस्पिटलमध्ये अबोलीने रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी स्वीकारली. पार्टटाइम नोकरी करतच दहावीत चांगल्या गुणांनी ती उत्तीर्ण झाली.

नियतीनं घेतलेली परीक्षा

वडील परागंदा झाल्याने सुमारे पंधरा वर्षे कुटुंब वडिलांना शोधत राहिलं. मात्र त्यांना यश आलं नाही. अबोलीनं महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच हॉस्पिटलसह नोकरी करतानाच पुन्हा एका मल्टिनॅशनल हॉटेलमध्ये पार्टटाइम काम स्वीकारलं. रोजच्या दिवसातून शिक्षणासोबतच दोन ठिकाणी काम करणं अवघड असलं तरी त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतलं. रोजच्या दिनक्रमात कुटुंबाला आधार देताना सुमारे पंधरा वर्षं ही कसरत सुरू होती. याच काळात मोठ्या बहिणीचा विवाह झाला. त्याचीही जबाबदारी अबोलीनं स्वतःकडे घेत आई-वडिलांचं कर्तव्य पूर्ण केलं. (latest marathi news)

यशाचा वाढता आलेख

बहिणीच्या विवाहानंतर बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. अबोलीला चित्रकलेची आवड असल्यानं वेगवेगळ्या स्केचेस (पेंटिंग) तयार करून त्यांची विक्री करून आर्थिक ओढाताण कमी करण्याचा प्रयत्न केला. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर आपल्यातील कलागुणांची जोपासना करतानाच इंटेरियर डिझायनर म्हणून शिक्षण पूर्ण केलं.

मात्र परिस्थिती पिच्छा पुरवून होती. परागंदा झालेल्या वडिलांमुळे खचलेल्या आईला आधार देतानाच अबोलीनं स्वतःची ओळख उभी करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. इंटेरियर डिझायनर म्हणून स्वतःची ओळख उभी करतानाच भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांनी आपली सेवा दिली.

सध्या गुजरातमधील भूज शहरात इंटेरियर डिझायनर म्हणून जबाबदारी पुढे नेत असतानाच नाशिकमध्येही त्यांचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या केमिकलविरहित परफ्यूमचा स्वतःचा ब्रॅन्ड तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

परिस्थितीला सामोरे जा

गेली पंधरी वर्षं बेपत्ता झालेल्या वडिलांची शोधमोहीमही त्यांनी सुरू ठेवत असतानाच आपल्या परिवारावर आलेल्या संकटांमध्ये कुटुंबाचा प्रमुख म्हणून अबोली बजावत असलेली भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. परिस्थिती बदलण्याची प्रत्येकामध्ये क्षमता असते, मात्र आपण अडचणींचा बाऊ करत स्वतःमधील आत्मविश्वासाकडे दुर्लक्ष न करता परिस्थितीला सामोरे जा, असा सल्लाही ‘अबोली’ या खचलेल्या मनांसाठी द्यायला विसरल्या नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT