Rajeshwari and Bhubaneswari esakal
नाशिक

Inspirational Story : पानटपरीच्या आधाराने नात्याची वीण घट्ट

Inspirational Story : खडतर परिस्थितीत अभ्यासाचे पारायण करीत उच्चशिक्षण घेतलं. परदेशात नोकरी देखील मिळवली. घरट्यातून भरारी घेत आकाशात मुक्त विहाराचे स्वप्न साकार होत असताना कुटुंबावर संकटांचे आभाळ कोसळले.

सकाळ वृत्तसेवा

Inspirational Story : खडतर परिस्थितीत अभ्यासाचे पारायण करीत उच्चशिक्षण घेतलं. परदेशात नोकरी देखील मिळवली. घरट्यातून भरारी घेत आकाशात मुक्त विहाराचे स्वप्न साकार होत असताना कुटुंबावर संकटांचे आभाळ कोसळले. क्षणाचाही विचार न करता त्यांनी नोकरी सोडली अन् वडिलांच्या निधनानंतर पानटपरी व्यवसाय स्वीकारला. उच्चशिक्षित तरुणींनी प्रचलित परंपरांना छेद दिलाच. पण कर्करोगग्रस्त आई अन् गतिमंद बहिणीसाठी त्यांनी केलेला त्याग समाजासाठी आदर्श ठरला. पानटपरी चालवणाऱ्या सख्ख्या बहिणींची ही कृतिशील धडपड ‘सावित्रीच्या लेकीं’ना उमेद देणारी ठरत आहे. - विजय इंगळे, नाशिक (nashik Inspirational Story With support of Pantapari bond of relationship is strengthened marathi news)

ना शिकच्या बापू बंगला परिसरात पानटपरी चालवणाऱ्या राजेश्वरी यांनी एम.एसस्सी (सूक्ष्मजीवशास्त्र), व बी.एड. केले आहे तर भुवनेश्वरी रासायनिक अभियंता आहेत. उषा व मधुकर शेट्टी या दांपत्याच्या राजेश्वरी, भुवनेश्वरी, वाघेश्वरी अशा लेकी. मूळच्या कर्नाटकमधील मंगळूर येथील मधुकर शेट्टी यांनी रोजी रोटीच्या लढाईत मुंबईहून थेट नाशिक गाठले. पानटपरी चालवत त्यांनी मुलींच्या शिक्षणाला बळ दिले.

गरज पडेल तेव्हा राजेश्वरी व भुवनेश्वरी यांनी अनेकदा पानटपरीवरही कामाचा अनुभव घेतला. ‘कमवा आणि शिका’ योजना, पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या (बार्टी) मदतीने त्यांचा शिक्षण प्रवास काहीसा सुखकारक झाला. परदेशात नोकरी देखील मिळाली. फाटक्या जिंदगीच्या आर्थिक सुखाचा परतावा मिळेल, असे वाटत असतानाच वडिलांना अपघातात होऊन अपंगत्व आले.

गतिमंद मुलीला सांभाळत उषा शेट्टी यांनी पतीला पानटपरी व्यवसायात मदत करत संसार सावरला. वडिलांचे अपंगत्व, गतिमंद बहिणीची काळजी असताना आईलाही कर्करोगाने ग्रासले. आईच्या उपचारासाठी राजेश्वरी, भुवनेश्वरी यांच्या नाशिक -मुंबई चकरा सुरू झाल्या. त्यांनी परदेशातील नोकरी सोडली. राजेश्वरीने शिक्षिका म्हणून तर भुवनेश्वरीने घरून काम करण्याचा पर्याय स्वीकारला. अचानक वडिलांचे निधन झाले. काही काळाने आई देखील कर्करोगाशी झुंज हरली. (latest marathi news)

संसाराची दोन भक्कम चाके निखळली. बहीण वाघेश्वरीची विशेष काळजी घेणारी आई गेल्याने आता बहिणी आईच्या भूमिकेत आल्या. तिच्या सुखासाठी, तिला सावरण्यासाठी, तिच्या सुश्रुतेसाठी राजेश्वरीने शिक्षिकेची नोकरी सोडली अन् पानटपरी व्यवसाय पूर्णवेळ स्वीकारला. हे करताना ज्ञानार्जनाचे कामही ती ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून करते. दुबईमधील एका कंपनीसाठी भुवनेश्वरी घरून काम करते.

संघर्षमय आयुष्याशी दोन हात करताना कष्टावर ठाम विश्वास ठेऊन यशस्वी वाटचाल करणाऱ्या या सावित्रीच्या लेकी समाजातील अनेक महिलांना लढण्याचे बळ देत आहेत. गतिमंद बहिणीसाठी आईपण निभवणाऱ्या या दोघींनी अतूट नात्याचा उत्तम दाखलाच समाजासमोर ठेवला आहे.

आयुष्यात वाट्याला आलेले दुःख कितीही भयाण असले तरी सकारात्मक विचारांच्या जोरावर नक्कीच मात करता येते, हे राजेश्वरी आणि भुवनेश्वरी यांनी दाखवून दिले आहे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, माणसाचे विचार ते ठरवत असतात, हेही या दोन्ही उच्चशिक्षित भगिनींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या संवेदनशील, कृतिशील धडपडीला समाजातील अनेक लोक सलाम करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT