Ajay Boraste, Hemant Godse esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : नाशिकच्या उमेदवारीचा चेंडू मुख्यमंत्री शिंदेंच्या कोर्टात; गोडसे, बोरस्तेंवर पुन्हा खलबते

Lok Sabha Constituency : राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यावर शिवसेनेतील (शिंदे गट) अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यावर शिवसेनेतील (शिंदे गट) अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. नाशिकमधून उमेदवारी कोण करणार, हे शिवसेनेने अद्याप स्पष्ट केलेले नाही. या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यापैकी उमेदवारी नेमकी कोणाला? (nashik Internal affairs in Shiv Sena have picked up pace after it announced that it is withdrawing of bhujbal )

या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. विद्यमान खासदार गोडसे यांच्या कामकाजासंदर्भातील नाराजी भारतीय जनता पक्षासह सर्वपक्षीय नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर वेळोवेळी मांडली आहे. शिवसेना शिंदे गटाकडे नाशिक राहणार, हे स्पष्ट झाल्यावर उमेदवार निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.

गोडसे यांच्यासंदर्भातील नाराजी त्यांना उमेदवारीसाठी अडसर ठरेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गोडसे यांच्या नावाची घोषणा युवा नेते श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन केल्यावर पक्षाची सर्वपक्षीयांकडून कोंडी झाली. संघर्षानंतर नाशिकची जागा पारड्यात पाडून घेण्यात शिवसेनेला यश आले असले, तरी आता उमेदवार कोण असेल, यावर नव्याने खलबते सुरू झालेली आहेत.(latest marathi news)

भाजपसह संघ परिवाराने अजय बोरस्ते यांच्या नावावर अनुमोदन दिले आहे. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चालणारा व समन्वय घडवून आणणारा नेता नाशिकचा उमेदवार असायला हवा, ही भाजपची भूमिका आहे. या आघाडीवर गोडसे यांच्याबद्दल नकारात्मक भावना दिसून येतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांत नाशिक, मुंबई, दिल्ली, अयोध्या अशा सतत वाऱ्या करणाऱ्या गोडसे यांना शिवसेना झुकते मात देते, की अजय बोरस्ते या नव्या चेहऱ्याचा विचार करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

''राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांच्या घोषणेमुळे नाशिक शिवसेनेचे (शिंदे गट) आहे व पुढेही राहील, याबद्दल शंका नाही. हेमंत गोडसे की अजय बोरस्ते, यांच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्याला आता फार वेळ लागणार नाही. महायुतीत या संदर्भात तिढा नव्हता, हे यापूर्वीही सांगितले होते. फक्त काही चर्चा व्हायच्या होत्या. त्याही आता संपल्या आहेत.''- संजय शिरसाट, आमदार, शिवसेना

''नाशिकमध्ये भाजपच्या सर्वेक्षणात नाराजी समोर आली होती. त्यामुळे उमेदवारी हेमंत गोडसेंना की अजय बोरस्तेंना, हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच घेतील. महायुतीचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य असेल.''- भरत गोगावले, प्रवक्ते, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT