Deputy Commissioner of Police Monica Raut with her family esakal
नाशिक

International Women's Day: घराच्या अन्‌ शहराच्याही खंबीर सुरक्षारक्षक! मोनिका राऊत

Nashik Police : नोकरी करताना ‘टाईम बॅलन्स अन्‌ आपल्या जोडीदाराची साथ’ असे तर कोणतीही जबाबदारी महिला सहज पेलू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक शहराच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत.

नरेश हाळणोर

International Womens Day : नोकरी करून संसाराचा गाडा ओढणे वाटते तितके सोपे नसते. परंतु तरीही महिला या दोन्ही जबाबदारी तितक्याच यशस्वीरित्या सांभाळताना पहावयास मिळतात. त्यातही पोलिस दलासारख्या अतिशय जबाबदारीच्या क्षेत्रात नोकरी करताना ‘टाईम बॅलन्स अन्‌ आपल्या जोडीदाराची साथ’ असे तर कोणतीही जबाबदारी महिला सहज पेलू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक शहराच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत. (Nashik International Womens Day Monika Raut marathi news)

मोनिका राऊत या मूळच्या सातारच्या. बी.कॉम.ची पदवी घेतल्यानंतर त्यांना खरं तर सीए व्हायचे होते. परंतु याच दरम्यान त्यांचा विवाह झाला तो नंदकुमार राऊत यांच्याशी. नंदकुमार राऊत हे लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून शासनाच्या सेवेत होते. सध्या ते मंत्रालयात उपसचिव या पदावर कार्यरत आहेत.

त्यांनीच मोनिका राऊत यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रोत्साहन दिले. अर्थात त्यासाठी त्यांना त्यांच्या सासरच्यांनीही आशीर्वाद देत प्रोत्साहित केले.  स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दोन वेळा अपयश आले परंतु खचून न जात आणि नंदकुमार यांची प्रेरणा घेऊन त्या पुन्हा जोमाने अभ्यासाला लागल्या. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी ठरल्या आणि २००७ मध्ये त्यांची पोलीस उपअधीक्षकांचे प्रशिक्षण नाशिकच्याच महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये झाले.

जबाबदारी ओझे मानलेच नाही

मोनिका राऊत या महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्यापासून त्यांनी विविध पदांवर आणि अतिसंवेदशनशिल परिस्थितीमध्ये जबाबदार्या पार पाडल्या. ठाणे, मुंबई, नागपूर, अकोला यासह काही विशिष्ठ समित्यांवर काम करताना त्यांनी आपल्या कामाची छापही सोडली.

अगदी धुळ्यासारख्या अतिसंवेदनशिल शहरात काम करताना दंगलसदृश्य परिस्थितीवर त्यांनी नियंत्रण मिळविले होते. परंतु त्यांनी कधीही आपण महिला आहोत, महिला असल्याच्या कोणत्याही कमीपणाचा आसरा घेत त्यांनी जबाबदारीचे ओझे स्वत:वर येऊ दिले नाही. उलट प्रत्येक जबाबदारी त्यांनी लिलया पेलत आपल्या कामाची छाप सोडली.

टाईम बॅलन्समुळे सर्वकाही शक्य

राऊत दाम्पत्यास दोन अपत्य. मोठी मुलगी एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला तर लहान मुलगा आठवीच्या वर्गात शिकतो. पती नंदकुमार हे नोकरीमुळे मुंबईला तर मोनिका राऊत या सतत बदल्यांमुळे फिरस्ती. परंतु अशा स्थितीतही केवळ टाईम बॅलन्सच्या माध्यमातून नोकरी आणि कुटूंब या दोन्हीं जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडल्या.

मुलांचे शिक्षण, त्यांचा होमवर्क आजही त्या स्वत:च घेतात. कोणत्याही प्रसंगी ‘ड्युडी फस्ट’ला प्राधान्य असले तरी कुटूंबातील स्वत:ची जबाबदारी त्यांनी तितक्याच गांभीर्याने पार पाडत आहेत. (Latest Marathi News)

बंदोबस्त अन्‌ जोडीदाराची साथ

जसे यशस्वी पुरुषामागे महिला असते असे म्हटले जाते, तसेच यशस्वी महिलेमागेही पुरुषच असतो या ठासून सांगणाऱ्या मोनिका राऊत एक आठवण आवर्जून सांगतात. पोलीस दलाची नोकरी म्हटल्यानंतर बंदोबस्त आणि अनेकदा घरापासून दूरही रहावे लागते. अशाच एका प्रसंगी त्यांचे पतींनी रजा घेऊन मुलांचा सांभाळ केला होता. अशीच साथ सासर अन् माहेरकडूनही मिळाल्यानेच त्या पोलीस दलातील आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडण्यात यशस्वी झाल्या असल्याचे सांगतात.

महिलांच्या समस्यांना प्राधान्य

मोनिका राऊत या महिला पोलीस अधिकारी असल्याने, त्या आजही ज्याठिकाणी कर्तव्य बजाविण्यासाठी जातात, त्याठिकाणी पोलीस दलातील महिला पोलिसा कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांची आवर्जून चौकशी आणि पहाणी करतात.

पोलीस ठाण्यात महिलांसाठी स्वतंत्र आरामकक्ष, शौचालयांची व्यवस्था वा बंदोबस्तांच्या ठिकाणी महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सर्वसोयीसुविधा स्वत: पाहतात. नसतील तर त्या उपलब्ध करून घेण्यासाठी पुढाकार घेतात. अनेकदा बंदोबस्तावेळी महिला कर्मचाऱ्यांना कौठुंबिक वा अन्य समस्या उद्‌भवतात त्या प्रत्येकवेळी समजून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न मोनिका राऊत यांनी केला आहे.

शहर पोलीस दलातील महिलांची संख्या

- पोलीस उपायुक्त - १, पोलीस निरीक्षक - ४, सहायक निरीक्षक- ५, उपनिरीक्षक - १३, सहायक उपनिरीक्षक - ०३, हवालदार - ११०, पोलीस नाईक - ३०, पोलीस शिपाइ - ३७९. एकूण : ५४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT