Nashik News : आजपासून नवीन कायदे लागू झाले असून, त्यानुसार शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत. तर काही गुन्हे हे जून महिन्यात घडलेले असल्याने पूर्वीच्या कायद्यानुसार त्यांची नोंद झाली असली तरी त्यांचा तपास मात्र नवीन कायद्यान्वयेच केला जाणार आहे. (Investigating crime under new laws at Police Commissionerate 5 cases filed on first day)
दरम्यान, दिवसभरात अदखल पात्र स्वरूपाचे १९ गुन्हे नवीन कायद्यान्वये दाखल करण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम या नवीन कायद्यान्वये आजपासून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीला गेल्याने याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भद्रकाली पोलिसांत किरकोळ मारहाणीचा गुन्हा घडला असता, संबंधित घटना २६ जूनला घडली होती. मात्र तक्रार सोमवारी (ता. १) आली. त्यामुळे भादंवि कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला. मात्र त्याचा तपास भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार केला जाणार आहे. (latest marathi news)
याचप्रमाणे उपनगर हद्दीत जबरी चोरीची घटना रविवारी (ता. ३०) घडली. त्यामुळे गुन्हा भादंवि कलम ३९२ अन्वये दाखल केला. मात्र त्याचा तपास भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार केला जाणार आहे. आडगाव हद्दीतही अपघाताची घटना २९ जूनला घडली असता, आज गुन्हा नोंद होताना भादंवि कलमान्वये दाखल झाला.
देवळाली कॅम्पात चोरीच्या गुन्ह्याचीही नोंद भादंवि कलमान्वये केली. मात्र या साऱ्या गुन्ह्यांचा तपास भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार केला जाणार आहे. आयुक्तालयातील सुमारे ९१ टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नवीन कायद्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.