Artisans making agricultural implements at Zodge esakal
नाशिक

Agriculture News : लोखंडाची कृषी औजारे महागली! किमतीत 40 ते 50 टक्के वाढ

जलील शेख

मालेगाव : महागाईने बि-बियाणे, खते, औजारे, मजुरी यासह अनेक वस्तूंचे भाव दुप्पटीने वाढले आहे. शेतकऱ्यांना शेती करणेही जिकरीचे बनले आहे. शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांना तोंड देत असतानाच लोखंडाच्या भाववाढीचा फटका शेतीला बसला आहे. (Iron agricultural tools became expensive 40 to 50 percent increase in price)

लोखंडाचे भाव वाढण्याबरोबरच लोखंडी साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतीची औजारांची किंमत ४० ते ५० टक्क्यांनी महागल्याने अनेक शेतकरी हवालदील झाले आहेत. शेतीसाठी वखर, पांभर, मके कोळपणी, छोटा वखर, नांगर, बाजरी कोळपणीसाठी लांडगी, खुरपे, विळे, पास, फाळ, कुऱ्हाड, शेण फावडे यासह बैल नांगर, टिलर, पल्टी नांगर यांचे भाव दुप्पटीने वाढले आहे.

२०१४ ते २०१५ मध्ये ३० ते ४० रुपये किलोने मिळणारे लोखंड सध्या ७० रुपये किलोने मिळत आहे. शेती औजारे तयार करण्यासाठी कारागिरांना लोखंडी गोल पाइप, चौरस पाइप व चॅनल यासह विविध आकाराचे लोखंड वापरले जाते. सध्या मोठे शेतकरी छोट्या ट्रॅक्टरने पेरणी व इतर कामे करतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलजोडीशिवाय पर्याय नाही, त्यामुळे शेती औजारे घेताना त्यांना मोठी कसरत करावी लागते.

दशकभरापूर्वी ५० रुपयाला मिळणारा विळा सध्या १५० रुपयाला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक बजेटही कोलमडले आहे. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती, कांदा व इतर पिकांना भाव नसल्याने असंख्य शेतकरी हवालदील झाले आहेत. लोखंडी बैलगाडीही ग्रामीण भागातही काही प्रमाणात हद्दपार होत आहे. बैलगाडीची जागा छोट्या ट्रॅक्टर व ट्रॉलीने घेतली आहे. (latest marathi news)

लोखंडाचे भाव वाढल्याने बदल

लोखंडाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना औजारे घेणेही परवडत नाही. शेतकऱ्यांबरोबरच शेती औजारे बनवून देणारे व्यावसायिकही दुसऱ्या व्यवसायाकडे वळत आहेत. २०१५ नंतर विजेचे, रॉड, गॅसकटर, मजुरी यांचे भाव दुप्पटीने वाढल्याने अनेकांनी या व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून दुसरे व्यवसाय सुरु केल्याची माहिती झोडगे येथील प्रकाश सोनवणे यांनी दिली.

शेती साहित्याचे दर असे

वस्तूचे नाव - सन २०१४ पूर्वीचे दर - सध्याचे दर

विळा - ५० रुपये - १५० रुपये

खुरपे - २० - ५०

पास - २०० - ३००

फाळ - १५० - २५०

कुऱ्हाड - ७० ते १०० - १५० ते २००

"अनेक व्यावसायिक पारंपरिक व्यवसाय बदलत आहे. शेती साहित्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना ते पुरत नाही." - भाऊसाहेब पवार, शेती औजारे बनविणारे व्यावसायिक, चांदवड.

"शेतीला लागणारी बी बियाणे खतांचे भाव दुपटीने वाढ झाली आहे. यात अवजारे महागली आहे. शासनाने शेती औजारांवर अनुदान द्यावा." - संतोष निरभवणे, शेतकरी,मंगरूळ, चांदवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT