drought  esakal
नाशिक

Nashik News : चणकापूर पूरपाण्याचा मुद्दा ठरणार कळीचा; दुष्काळाने होरपळलेले देवळावासीय आक्रमक

Nashik : देवळा तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका लढवणाऱ्यांसाठी आता चणकापूर उजव्या काळव्याचा पाणीप्रश्न महत्वाचा ठरणार आहे.

मोठाभाऊ पगार

Nashik News : देवळा तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका लढवणाऱ्यांसाठी आता चणकापूर उजव्या काळव्याचा पाणीप्रश्न महत्वाचा ठरणार आहे. हा कालवा होण्याच्या आधीही आणि आता नंतरही प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा निर्णायक ठरत आल्याने आता याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या कालव्याचे पाणी मिळावे यासाठी आंदोलने, उपोषणे पुन्हा चालू झाली आहेत आणि चालूच राहणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. (issue of Chankapur flood water will be aggressiveness of drought stricken Deola residents)

देवळा तालुक्याला चणकापूर उजव्या कालव्याच्या माध्यमातूनच सिंचनासाठी पाणी मिळण्याची आशा आहे. मात्र या कालव्याची वहनक्षमता कमी असल्याने त्याला दरवर्षी फुटीचे ग्रहण लागते. त्यामुळे डोळ्यांदेखत पाण्याचा महापूर वाहून जात असताना कालव्यातून पाणी मिळत नसल्याची खंत या पूर्व भागाला कायम सतावत असते. गतवर्षी तालुक्यात दुष्काळग्रस्त स्थिती असताना पाण्याची नितांत गरज होती मात्र कमी वहनक्षमता, कालवा फुटण्याचे प्रकार, पाण्यावरून झालेले वाद यामुळे तालुका दुष्काळात होरपळत राहिला. पुढील काळात असे दुष्काळाचे चटके बसू नयेत म्हणून हा रेटा आता वाढू लागला आहे.

अशी आहे कालव्याची स्थिती

पुनंद प्रकल्पांतर्गत असलेला चणकापूर उजवा कालवा २००० पासून प्रवाहित असला तरी बहुतांश कालवा डोंगरालगत असल्याने कालव्यावरील भरावाची माथा पातळी संकल्पित माथापातळीपेक्षा कमी झाली आहे. यामुळे हा कालवा पूर्ण क्षमतेने वाहू शकत नाही. या कालव्याच्या मुखाशी १७६ क्यूसेक्स वहनक्षमता असली तरी प्रत्यक्षात ती १४० इतकीच मिळते. रामेश्वर धरणाजवळ तर ती ५५ क्यूसेक्स इतकीच असते. यामुळे रामेश्वर धरण भरण्यास तीन आठवडे कालावधी लागतो.(latest marathi news)

नूतनीकरणाची गरज

या कालव्याचे नूतनीकरण करत वहनक्षमता ३०० क्यूसेक केल्यास पावसाळ्यातील पूरपाण्याचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना होईल. दरवर्षी हजारो क्यूसेक पुरपाणी गिरणा धरणात वाहून जाते. आपल्याकडे तशी साठवण क्षमता आणि मोठे कालवे असले तर यातील काही पाणी फिरवता येणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर चणकापूर उजव्या कालव्याची वहनक्षमता वाढवणे हे अत्यंत गरजेचे आहे.

''देवळा तालुक्यासाठी मांजरपाडा-२ किंवा नारपार प्रकल्पाच्या माध्यमातून मध्यंतरी सर्व्हे झालेला आहे. चणकापूर उजव्या कालव्याची वहनक्षमता वाढवण्यासाठी निधी मंजूर झाल्याचेही कळले होते. मात्र प्रत्यक्षात वहनक्षमता वाढली नाही आणि त्यामुळे पूरपाण्याचा लाभ मिळत नसल्याने शेतीचे उत्पादन घेणे अवघड होऊन बसते. हा कालवा पूर्ण क्षमतेने कसा वाहील एवढे काम व्हावे हीच अपेक्षा.''- शिवाजीराव पवार, संचालक, देवळा बाजार समिती.

आंदोलन, उपोषणांची तीव्रता वाढणार

चणकापूर उजव्या वाढीव कालव्यास पाणी सोडण्याबाबत २५ जूनला होणाऱ्या बेमुदत उपोषणाच्या पार्श्वभूमीवर चणकापूर कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करत या कालव्याची वहनक्षमता वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला असून शासनास सादर केला आहे, पाठपुरावा चालू आहे असे सांगितले. त्यामुळे तूर्तास हे उपोषण मागे घेतले असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. मागील आठवड्यात सांगवी येथेही याबाबत उपोषण करत या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेतले होते. पुढील काळात आणखी आंदोलनांची तीव्रता वाढणार असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT