सटाणा : शहरातून जाणाऱ्या साक्री - शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील व्ही. पी. एन. विद्यालयाजवळ आज पहाटे साडेचारच्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. शहरातून जाणारा हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शहर वळण रस्त्याचा प्रश्न प्रलंबितच असून हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहर वळण रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. (Nashik issue of outer ring road in Satane on agenda again news)
नंदुरबारहून वाळू घेऊन जाणारा ट्रक (एम.एच. १५, जी. व्ही.६३७२) चालक सोनू पोमनर हा नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात निघाला होता. पहाटे साडेचारच्या सुमारास सटाणा शहरात पोहोचताच भरधाव असलेल्या ट्रकचालकाने व्ही. पी. एन. विद्यालयाजवळील दुभाजकाला जोरदार धडक दिली.
या अपघातामुळे पहाटेच्या शांततेत मोठा आवाज झाला. या आवाजामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. काही नागरिक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले होते. पुढील दोन्ही चाके निखळून पडली होती. दुभाजकावरील नगरपरिषदेचा स्ट्रीट लाईटचा विद्युत खांबही कोसळला होता.
हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या परिसरात शाळा, महाविद्यालय, दवाखाना, बँका, व्यापारी, प्रतिष्ठाने, हॉटेल्स असल्याने दिवसभर विद्यार्थी व नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र सुदैवाने हा अपघात पहाटेच्या सुमारास घडल्याने मोठी जीवितहानी टळली. (latest marathi news)
त्या आठवणी ताज्या...
याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा दुभाजकावर आदळल्याने भीषण अपघात झाला होता. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातात सिलेंडरच्या स्फोटाने सटाणा शहर हादरून गेले होते. अनेकांनी त्या आठवणी आज बोलून दाखविल्या. त्याचबरोबर महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड वाहतूक, बेशिस्त वाहन पार्किंग यामुळे शहरवासियांसह वाहतुकीला मोठा त्रास होत असतो.
महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने गेल्या दहा वर्षात शाळकरी विद्यार्थ्यांसह अनेक निष्पाप नागरिकांचा नाहक बळीही गेला आहे. सटाणा शहराबाहेरून जाणारा बायपास झाल्याशिवाय पर्यायच नसल्याच्या तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.