Nashik Gangapur Dam esakal
नाशिक

Nashik Gangapur Dam : पितृपक्षानंतरचं गंगापूर धरणाचे जलपूजन; महापालिकेकडून नवरात्रोत्सवाचा मुहूर्त निश्‍चित

Gangapur Dam : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण पूर्ण क्षमेतेने भरल्याने परंपरेनुसार प्रशासनामार्फत गंगापूर धरणात जलपूजन केले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण पूर्ण क्षमेतेने भरल्याने परंपरेनुसार प्रशासनामार्फत गंगापूर धरणात जलपूजन केले जाणार आहे. परंतु जलपूजनाचा मुहूर्त पितृपक्षानंतर निश्‍चित करण्यात आला आहे. पितृपक्षानंतर शुभ कामे करण्याची बाब सुचविण्यात आल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे. यंदाही प्रशासकीय राजवट असल्याने आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या हस्ते गंगापूर धरणावर विधीवत जलपूजन होईल. (Jal Pujan Municipal Corporation of Gangapur Dam fixed time of Navratri festival )

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरण भरल्यानंतर दरवर्षी धरणक्षेत्रावर जाऊन महापौरांच्या हस्ते जलपूजन केले जाते. प्रथम महापौर स्व. शांतारामबापू वावरे यांच्यापासून ही जलपूजनाची परंपरा आहे. तसेच दरवर्षी गंगापूर धरण ७० टक्के भरल्यानंतर महापालिकेकडून जलपूजन केले जाते. यंदा जलपूजनाचा प्रशासनाला विसर पडला. पावसाने उघडीप दिल्यानंतर जलपूजनाचा विषय अनंत चतुर्दशीच्या दिवशी समोर आला.

परंतु पितृपक्ष सुरू होत असल्याने या काळात पूजन करणे योग्य नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर नवरात्रोत्सवात जलपूजन केले जाणार आहे. १५ ऑक्टोबरला पावसाळा संपल्याची अधिकृत घोषणा होते. त्यापूर्वी जलपूजन केले जाणार आहे. महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे आयुक्तांच्या हस्ते नारळ वाहून तसेच विधीवत पूजा करून जलपूजन केले जाणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाने जलपूजनाची तयारी सुरू केली आहे. (latest marathi news)

प्रशासनाकडून सारवासारव

शुभ-अशुभ या अंधश्रद्धेच्या बाबी असल्याने टीका होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सारवासारव करण्यात आली. प्रथम पाणीपुरवठ्याच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. पंधरा दिवसात किरकोळ दुरुस्ती केली जाईल. त्यानंतर परंपरेप्रमाणे जलपूजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

धरणातील जलसाठा (दशलक्ष घनफुटात)

धरण जलसाठा

गंगापूर समूह ९०४२

दारणा ७०६०

मुकणे ६६५०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT