water and sanitation mission  esakal
नाशिक

Cleanliness Drive : जिल्ह्यात 5 जूनपासून जलकुंभ स्वच्छता मोहीम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : स्वच्छ भारत अभियान आणि पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ५ ते १० जून या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या कुंभांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी केले. (Jalkumbh Cleanliness Campaign from 5th June in district)

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत पाणी व स्वच्छताविषयक विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. २८) जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रकल्प संचालक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हास्तरीय संपर्क अधिकारी यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय गटसमन्वयक, समूह समन्वयक, कंत्राटी अभियंता, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार यांची आढावा बैठक झाली.

या वेळी जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याबाबत तसेच त्याचा निधी मागणी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम, माझी वसुंधरा अभियान आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. (latest marathi news)

पाणी गुणवत्तेबाबत आढावा घेताना दूषित पाणी नमुने व टीसीएल नमुने यांची फेरतपासणी करण्याबाबत, तसेच सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व जैविक व रासायनिक तपासणी अभियान ग्रामीण भागातील सर्व नळ पाणीपुरवठा योजनांचे पाणी नमुने ३० जूनपर्यंत तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच, सध्या पाणीटंचाईमुळे अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू असून, या सर्व टँकरमधील पाण्याचेही नियमित शुद्धीकरण करण्याचे व त्याच्या नोंदी ठेवण्याचे निर्देश प्रकल्प संचालक पाटील यांनी दिले. आढावा बैठकीस जिल्हा कक्षातील सल्लागार तसेच तालुकास्तरावरील सर्व गटसमन्वयक, समूह समन्वयक, कंत्राटी अभियंते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT