Water Resources Department of Maharashtra esakal
नाशिक

Nashik News : ‘काश्‍यपी’च्या पाण्याला ‘जलसंपदा’चा पुन्हा ब्रेक! रिसॉर्ट मालकांच्या दबावाची चर्चा; 2 दिवसात अवघे 58 दलघफु पाणी

Nashik News : शेतकऱ्यांच्या विरोधामुळे पाणी सोडले नसल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला असला तरी काश्‍यपीच्या बाजूला तयार झालेल्या रिसॉर्टची रया लयाला जाईल म्हणून दबाव असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पोलिस बंदोबस्तात काश्‍यपी धरणाचे पाणी गंगापूरसाठी सोडल्यानंतर नाशिककरांवरील जलसंकट तूर्त टळण्याचा आनंद जलसंपदा विभागाच्या आडमुठेपणामुळे क्षणभंगुर ठरला. शेतकऱ्यांच्या विरोधाचे कारण देत जलसंपदा विभागाने मंगळवारी रात्री उशिरा काश्‍यपी धरणाचे दारे बंद केले.

दोन दिवसात अवघे ५८ दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणापर्यंत पोचल्याने नाशिककरांवरील जलसंकट कायम राहीले. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या विरोधामुळे पाणी सोडले नसल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला असला तरी काश्‍यपीच्या बाजूला तयार झालेल्या रिसॉर्टची रया लयाला जाईल म्हणून दबाव असल्याचे बोलले जात आहे. (Nashik Jalsampada breaks water of Kashyapi dam again)

मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. न्यायालयात याचिका दाखल झाल्याने जवळपास दीड टीएमसी पाण्याची बचत झाली. परंतु दुसरीकडे गंगापूर धरणातील मोठा पाणीसाठा रिक्त झाला. परिणामी महापालिकेच्या आरक्षणात कपात झाली.

महापालिकेने जलसंपदा विभागाकडे ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविली. परंतु आरक्षणात कपात करताना पाच हजार ३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले. ३१ जुलैपर्यंत पाण्याचे आरक्षण लक्षात घेता अठरा दिवसांच्या पाण्याचा शॉर्टफॉल आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज होता, परंतु जून महिना कोरडा जात असल्याने पाणी बचत सुरु झाली.

जल संकटाचा सामना करण्याची तयारी सुरू असतानाच काश्‍यपी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या काहींनी धरणातून पाणी सोडण्यास मज्जाव केला आहे. परिणामी गंगापूर धरणाची जलपातळीत वाढ न होता रोजच्या वापरामुळे अधिक खालावत असल्याने शहरात ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईची भीती निर्माण झाली आहे.

पुन्हा जल संकट

गंगापूर धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने काश्‍यपी धरणातील शिल्लक पाणी गंगापूर धरणात फोडणीची तयारी जलसंपदा विभागाने केली मात्र विरोधामुळे जलसंपदा विभागाने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. सोमवारी (ता. २४) जलसंपदा विभागाने पोलिस बंदोबस्तामध्ये पाचशे क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यास सुरवात केली.

त्यामुळे नाशिककरांवरील जल संकट तात्पुरते पुढे ढकलले गेले असे म्हणाले गेले मात्र मंगळवारी विरोध झाल्याचे निमित्त करून जलसंपदा विभागाने मंगळवारी रात्री काश्यपीमधून गंगापूर धरणाकडे येणारा जलप्रवाह बंद केला. त्यामुळे नाशिककरांसमोर पुन्हा जल संकट उभे राहिले आहे. (latest marathi news)

शेतकऱ्यांच्या विरोधाचे कारण

सोमवारी पोलिस बंदोबस्तात ५०० क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यास सुरवात झाल्यानंतर नाशिककरांवरील जल संकट तूर्त टळल्याचे मानले गेले. मात्र मंगळवारी काही शेतकऱ्यांनी विरोध केल्याचे निमित्त करून जलसंपदा विभागाने पाण्याचा प्रवाह बंद केला.

पाणी सोडण्यास सुरवात झाली. त्या वेळी ४१२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा काश्यपीमध्ये होता. पाणी बंद केल्यानंतर ३५४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा धरणात आहे. याचाच अर्थ दोन दिवसात ५८ दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणात पोचले.

तर संकट टळेल

जलसंपदा विभागाकडून गंगापूर धरण समूह म्हणून नाशिकसाठी पाणी आरक्षित केले जाते. समूहामध्ये काश्यपी बरोबरच गौतमी या धरणांचा समावेश होतो. त्यामुळे आरक्षित पाणी सोडणे आवश्यक आहे. पोलिस बंदोबस्त मिळाला असताना धरणातून पुरेशा वेगाने पाणी का सोडले गेले नाही, असा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक काश्यपी धरणामध्ये १०० दशलक्ष घनफूट पाणी असले तरी अडचण नाही. त्यामुळे उरलेले २५४ दशलक्ष घनफूट पाणी सोडणे आवश्यक आहे.

"काश्यपी धरणामधून गंगापूरसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आलेले नाही, मात्र पाण्याचा वेग कमी केला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असल्याने पाण्याचा वेग कमी केला आहे."

- सोनाली शहाणे, अधीक्षक अभियंता जलसंपदा विभाग, नाशिक.

गंगापूर धरण समूहातील पाणी परिस्थिती (दशलक्ष घनफुटात)

धरण उपलब्ध पाणी साठा टक्केवारी

गंगापूर ९५५ ६.९६

काश्‍यपी ३५४ १९.११

गौतमी १९० १०.१७

------------------------------------------------------------

एकूण १४९९ १६ (सरासरी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT