Traffic congestion on the roads leading from Nashik to Malegaon at Hotel Jatra Chauphuli. esakal
नाशिक

Nashik News : जत्रा चौफुली बनली अपघातप्रवण! वाहतूक कोंडी झाली नित्याचीच

Nashik News : या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने हॉटेल जत्रा चौफुली ही अपघातप्रवण क्षेत्र बनत चालला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : मुंबई- आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रा चौफुलीवर काही बेकायदेशीर हातगाड्या, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. यामुळे या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने हॉटेल जत्रा चौफुली ही अपघातप्रवण क्षेत्र बनत चालला आहे.

याकडे महापालिका अतिक्रमण विभाग तसेच वाहतूक शाखेने लक्ष केंद्रित करून चौफुली वाहतुकीसाठी मोकळी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. (Nashik Jatra Chaufuli become prone to accidents news)

नाशिक शहराचा विस्तार दिवसागणिक वाढत चालला आहे. जत्रा हॉटेल चौफुली कायमच नागरिक अन्‌ वाहतुकीच्या वर्दळ सुरू असते. या रस्त्यातून नागरिकांना मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. या चौफुलीवर अनधिकृत हातगाड्या फळविक्रेते तसेच रिक्षा उभ्या राहतात.

त्यात काही बेशिस्त नागरिक चारचाकी वाहन वाटेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत असते. या परिसरातील वाढत्या अतिक्रमण आणि वाहनतळाबाबत महापालिका आणि वाहतूक शाखेकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मागील वर्षी छत्रपती संभाजीनगर रोडवर ट्रक आणि लक्झरी बसच्या भीषण अपघात होऊन अनेक नागरिकांचा बळी गेला होता. या जत्रा चौफुलीवरदेखील अशा अपघाताची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेत उपाय योजना करणे गरजेचे आहे. (latest marathi news)

अतिक्रमण विभागाचा काणाडोळा

हॉटेल जत्रा चौफुली भागात अनेक छोट्या मोठ्या टपऱ्या हातगाड्या, फळविक्रेते धारकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. महापालिका अतिक्रमण विभागाने या चौफुलीकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमण वाढले असल्याचे बोलले जात आहे. अतिक्रमण विभाग याकडे काणाडोळा का करतोय, असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

टवाळखोरांचा उपद्रव

जत्रा हॉटेल चौफुली हा नेहमीच वाहनाची वर्दळ, तसेच गजबजलेला असतो. या ठिकाणी काही टवाळखोर रस्त्याने ये- जा करणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन युवतीचे छेड प्रकार करीत असल्या बाबत नागरिक बोलत आहेत. या टवाळखोरांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT