Java Plum  esakal
नाशिक

Nashik News : जांभूळ ठरले कांदा, हापूस आंब्याला भारी! किरकोळ बाजारात 300 रुपये किलोने विक्री

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : औषधी गुणधर्मामुळे वर्षभर मागणी असलेले जांभूळ सध्या कांदा आणि हापूस आंब्यालाही भारी पडले आहे. टपोऱ्या जांभूळ ३०० रुपये किलोने विक्री होताना दिसते. पावसाळा सुरू झाल्याने जांभळाची आवक घटली असून दरात तेजी कायम असल्यामुळे ग्रामीण भागातील विक्रेते आजही शहरात ठिकठिकाणी विक्री करताना दिसतात. (Java Plum sold at Rs 300 per kg)

नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा, नाशिक व दिंडोरी या आदिवासी बहुल भागात जांभळाचे उत्पादन घेतले जाते. शेताच्या बांधावर, जंगलात उगवलेल्या झाडांचे टपोरे जांभूळ शहरातील नागरिकांना भुरळ घालतात. टोपलीमध्ये आकर्षक पद्धतीने त्यांची मांडणी करून विक्रीसाठी ठेवले जातात. कॉलेज रोड, कॅनडा कॉर्नर, इंदिरानगर, नाशिक रोड, पंचवटी भाजी बाजार परिसरात जांभळाची विक्री होते.

केवळ ग्राहकांकडूनच नाही तर प्रक्रिया उद्योगातही त्यास मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही संधी ओळखून कोकण बहाडोली सारख्या सुधारित वाणाच्या लागवडीसह पसंती दिली आहे. जांभळाच्या झाडापासून सरासरी ९० ते १२० किलोपर्यंत उत्पादन मिळते. जांभूळ उत्पादक थेट खरेदीदारांना विक्री करतात.

क्रेट तसेच पाटीप्रमाणे सौदा झाल्यानंतर खरेदीदार सकाळी सहा वाजेपासून मनुष्यबळाच्या मदतीने फळांची काढणी टप्प्याटप्प्याने सुरू करतात. पूर्ण झाड किंवा क्रेटनुसार खरेदीदारांकडून व्यवहार होतो. काढणी सुरू असताना पाऊस आला तर झाडावर पिकलेली जांभळे घोसातून गळून पडतात.

त्यामुळे सौदा झाल्यानंतर त्याची जोखीम खरेदीदार घेतात. किडी, बुरशीचा प्रादुर्भाव होतो. माशीने डंख मारल्याने पडजड होते. त्यामुळे पाऊस पडण्यापूर्वी माल उतरवण्याची कसरत होत आहे. किरकोळ विक्रेते हे नाशिक शहरासह ग्रामीण भागातही विक्री करतात. नाशिक शहरातील पंचवटी परिसर, भाभानगर, नाशिक बाजार समिती.

कॉलेज रोड, गंगापूर रोड, सिडको, जुने नाशिक, नाशिक रोड या भागात जांभळाची विक्री होते. त्र्यंबकेश्‍वर रोड, सप्तशृंगी देवी, सापुतराकदे जाणाऱ्या रस्त्यांवरही जागोजागी जांभूळ विक्रेते दिसतात. मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव टोल नाका, नाशिक-पुणे महामार्गावरील टोलनाका ही देखील विक्रीची ठिकाणे आहेत.

खरेदी-विक्रीचे प्रमुख ठिकाणे

नाशिक बाजार समिती परिसर (दिंडोरी रोड), घोटी बाजार समिती परिसर, एचएएल पुलाजवळ (ओझर मिग ता.निफाड), करंजाळी (ता.पेठ), सिन्नर, सुरगाणा, बोरगाव (ता.सुरगाणा) याशिवाय शहरातील विविध ठिकाणी टोपलीमध्ये जांभळाची हात विक्री होते.

जांभळाचे भाव

किरकोळ विक्री-३०० रुपये किलो

घाऊक विक्री-७० ते ९० रुपये पावशेर

जांभूळ उत्पादकांकडून- ३५ ते ६० रुपये पावशेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT