Due to Gudi Padva, citizens have increased their tendency to buy gold. There was a rush at the gold and silver showroom here on Sunday. esakal
नाशिक

Nashik Jewellery Market : सोन्याची चकाकी आणखी वाढणार! महिनाभरात भाव वाढणार, चांदी लाखाचा टप्पा गाठणार

Nashik News : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदीसाठी नागरिकांची दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदीसाठी नागरिकांची दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. सध्या बाजारात सोने प्रतितोळा ७१ हजार रुपयांवर असून, चांदी प्रतिकिलो ८१ हजारांवर आहे. काही महिन्यांत या दरांत अजून वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली. (Nashik Jewellery Market price will increase within months news)

गुढीपाडवा, अक्षयतृतीया अन् लग्नसराईत नागरिक मोठ्या प्रमाणावर सोने-चांदी खरेदी करतात. यंदा साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडवा अन् अक्षयतृतीयेच्या पार्श्वभीवर तसेच मेमध्ये लग्नांचे मुहूर्त नसल्याने लग्नसराईला जरी ‘ब्रेक’ लागलेला असला तरी बाजारातील सोने-चांदीच्या उतार- चढावांमुळे नागरिकांची आतापासूनच दुकानांमध्ये दागिने खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.

२४ कॅरेट सोन्यासाठी ७१ हजार रुपये भाव आहे, तर २२ कॅरेट सोन्यासाठी ६५ हजार ४०० भाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांमुळे अक्षयतृतीयेपर्यंत २४ कॅरेट सोन्यासाठी ७५ हजार रुपये प्रतितोळा इतका भाव होऊ शकतो, अशी शक्यता सुवर्ण व्यावसायिक मयूर शहाणे यांनी व्यक्त केली.  (latest marathi news)

चांदीत गुंतवणूक ठरेल लाभदायक

चांदीचे दरही प्रतिकिलोसाठी ८१ हजारांवर आहेत. या आधुनिकीकरणाच्या काळात ई-वाहनांच्या निर्माणात तसेच सोलर पॅनलच्या निर्मितीत चांदीचा वापर केला जातो. ई-वाहने, बॅटरी, सोलर पॅनल हे देशाचं भविष्य असून, यामुळे चांदीचे उत्पादन तसेच मागणीत वाढ होईल. यामुळे वर्षभरात चांदीचे दर प्रतिकिलासाठी एक लाखांवर जातील. त्यामुळे आताच्या काळात चांदीतील गुंतवणूक लाभदायक ठरेल, अशी सुवर्ण व्यावसायिक शक्यता महावीर चोपडा यांनी व्यक्त केली.

"गुढीपाडवा, अक्षयतृतीया अन् लग्नसराईमुळे नागरिकांमध्ये सोने-चांदी खरेदीसाठी उत्साह आहे. महिनाभरात सोन्याच्या दरांत अजून वाढ होईल, अशी शक्यता आहे."

- मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकार

"सोने-चांदीतील गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरली आहे. आज दिसत असलेले सोने-चांदीचे भाव भविष्यात अजून वाढतील. त्यामुळे यातील गुंतवणूक लाभदायक ठरेल."

- महावीर चोपडा, संचालक, न्यू श्रीनिवास ज्वेलर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT