Electricity meter damaged esakal
नाशिक

Nashik Jogging Track Problem : समस्यांमुळे चुकला जॉगिंगचा ‘ट्रॅक’

Latest Nashik News : शहरातील जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. परंतु स्वतंत्र खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात नाही. त्यामुळे उद्यान देखभाल- दुरुस्ती या शीर्षकाखाली तरतूद केलेल्या सहा कोटींच्या निधीतूनच खर्च करावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Jogging Track Problem : ‘होऊ द्या खर्च’ हे धोरण डोळ्यासमोर ठेवून राज्यात सर्वाधिक उद्याने असलेले शहर म्हणून नाशिकचा लौकिक नगरसेवकांनी सर्वदूर पोचविला. तीच गत जॉगिंग ट्रॅकच्या बाबतीतही आहे. शहरात कागदोपत्री अधिकृत ४८ जॉगिंग ट्रॅक आहेत.

परंतु मतदारांना आपल्या कार्यकाळात कामे दाखविण्यासाठी जॉगिंग ट्रॅक तयार करण्याची माजी नगरसेवकांनी केलेली घाई आता महापालिकेला खर्चाच्या बाबतीत ‘नाकापेक्षा मोती जड’ याप्रमाणे ठरताना दिसत आहे. (Nashik Jogging track problems)

ट्रॅकवर गवत उगवल्याने जॉगर्सला अडचण आणि खेळण्यांची दुरवस्था

वास्तविक जॉगिंग ट्रॅक संकल्पना व्यापक व विज्ञानावर आधारित आहे. परंतु उद्यानाच्या बाह्य भागाला लागून चालण्यासाठी केलेली जागा, महापालिकेच्या मोकळ्या जागेवर सरळ रेषेत पेव्हर ब्लॉक टाकून तयार केलेला रस्ता हेदेखील जॉगिंग ट्रॅकच्या व्याख्येत बसवून नागरिकांच्या सोईपेक्षा खर्चावरच अधिक भर देण्यासाठी केल्याचे दिसून येते.

शहरातील जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. परंतु स्वतंत्र खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात नाही. त्यामुळे उद्यान देखभाल- दुरुस्ती या शीर्षकाखाली तरतूद केलेल्या सहा कोटींच्या निधीतूनच खर्च करावा लागत आहे. नुकताच पावसाळा संपत असल्याने उद्याने, जॉगिंग ट्रॅकवर गर्दी वाढत आहे. परंतु, सद्यःस्थितीत सर्वच ट्रॅकची दुरवस्था झाली आहे.

अशा आहेत समस्या

ट्रॅकवर गवत उगवल्याने जॉगर्सला अडचण

धुळ व मातीमुळे श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता

ट्रॅकलगतच्या शोभिवंत झाडांची दुरवस्था

ट्रॅकवरील लायटिंग, म्युझिक सिस्टीम बंद अवस्थेत

ट्रॅकवर सुरक्षारक्षक नसल्याने वृध्द व लहान मुले असुरक्षित

जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था.

सार्वजनिक शौचालय नसल्याने कुचंबणा

झाडांच्या बुंध्यास रंगरंगोटी नसणे

ट्रॅकच्या बाजूने ग्रिल गायब

"पावसाळा संपत असल्याने उद्याने व जॉगिंग ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहेत. निधी अपुरा पडत आहे. मात्र जॉगर्सच्या सुविधांना प्राधान्य देवून कामे केली जात आहेत."

- विवेक भदाणे, उपायुक्त, उद्यान विभाग, महापालिका.

विभागनिहाय ट्रॅक

पश्‍चिम

गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅक

कृषीनगर जॉगिंग ट्रॅक

वि. वा. शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक

समर्थ जॉगिंग ट्रॅक

गोदापार्क

पूर्व

- इंदिरानगर

नाशिक रोड

- शिखरेवाडी

- दत्तमंदिर रोड

- विहीतगाव

- निसर्ग उपचार केंद्र, जयभवानी रोड

- इच्छामणी मंदिर

- गाडेकर मळा

- मुक्तिधाम मंदिर मागील बाजूस शाळा क्रमांक १२५

- वास्तु पार्क जॉगिंग ट्रॅक

- केरू-पाटीलनगर

- श्री कलानगर

- चेहेडी क्रीडांगण

- पंचक स्कूल

सिडको

- राजे संभाजी स्टेडिअम

- चौक क्रमांक ४ जॉगिंग ट्रॅक

- गामणे मळा

- कै. शिवराम वझरे

- कै. मुरलीधर वझरे

- बाळासाहेब ठाकरे

- संत गाडगे महाराज

- पाटीलनगर.

- हेगडेवारनगर

- पवननगर

- महाकालीनगर

सातपूर

- क्लब हाऊस

- काळेनगर

- संत तुकाराम महाराज क्रीडांगण

- लोखंडे जॉगिंग ट्रॅक

- नवश्‍या गणपती

- सुवर्णकार जॉगिंग ट्रॅक

- शिवसृष्टी जॉगिंग ट्रॅक

- मॉँसाहेब मीनाताई ठाकरे

- सिरीन मेडोज

- चौधरी जॉगिंग ट्रॅक

पंचवटी विभाग

- मोकळबाबानगर

- जिजामाता उद्यान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT