Junior College Admission : इयत्ता अकरावी २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशिकेची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी (ता.२२) जाहीर करण्यात आली. यामध्ये ३ हजार ६४४ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली असून यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन दिवसात (ता.२४) पर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. त्याचबरोबर पुढील प्रवेश फेरीच्या रिक्त जागांची माहिती गुरुवारी (ता.२५) प्रसिद्ध केली जाणार आहे. ( Junior College Admission 11th admission third list announced )
रिक्त जागांची स्थिती लक्षात घेऊन येत्या आठवड्यात विशेष फेरीचे नियोजन केले जाणार आहे. शहरातील ६९ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या २८ हजार जागांसाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नियमित दोन फेऱ्यांनंतर ९ हजार ६६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून अद्यापही १८ हजार ५२२ जागा रिक्त असल्याने तिसऱ्या फेरीसाठी १५ हजार ३६५ जागा उपलब्ध होत्या.
या फेरीसाठी १० हजार ५७२ विद्यार्थी पात्र ठरले पैकी सहा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातून ३ हजार ६४४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. १ हजार ७५० विद्यार्थ्यांना पहिल्या तर ७८७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. तिसऱ्या फेरीच्या पहिल्या दिवशी २१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. (latest marathi news)
इयत्ता अकरावी प्रवेश निश्चितीत राज्य शिक्षण मंडळाच्या ८ हजार ९५३, सीबीएसई बोर्डाच्या ४७८ तर इतर बोर्डाच्या २३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. खुल्या प्रवर्गातील २ हजार २०९, अनुसूचित जाती प्रवर्गातील २ हजार ३२, अनुसूचित जमाती प्रवर्गातील १ हजार ५६, इतर मागास प्रवर्गातील २ हजार ८१६ तर एसबीसी प्रवर्गातील १०३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर, आतापर्यंत ५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत.
शाखानिहाय झालेले प्रवेश
विज्ञान : ४३६९
वाणिज्य : ३५०७
कला : १६३७
एचएसव्हीसी : १५४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.