Admission  esakal
नाशिक

Junior College Admission : अकरावीची तिसरी यादी सोमवारी; नोंदणीची प्रक्रिया पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

Junior College Admission : इयत्ता अकरावीसाठी तिसऱ्या नियमित फेरीची निवडयादी सोमवारी (ता. २२) प्रसिद्ध होणार आहे. तत्‍पूर्वी सहभागासाठी आवश्‍यक नोंदणीप्रक्रिया संपली असून, त्‍यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता किती विद्यार्थ्यांची निवड होते, याकडे लक्ष लागून राहणार आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया पार पडत आहे. याअंतर्गत आत्तापर्यंत दोन नियमित फेऱ्या पार पडल्‍या आहेत. (Admission of 11th third list on Monday )

आत्तापर्यंत जेमतेम साडेनऊ हजार विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश घेतलेले आहेत. त्‍यामुळे ६६ टक्‍के जागा रिक्‍त असून, तिसऱ्या फेरीत जास्‍तीत जास्‍त विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. त्‍यासाठी प्रथम विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तायादीत होणे आवश्‍यक आहे. तिसऱ्या फेरीत नोंदणीची मुदत संपलेली आहे. (latest marathi news)

पुढील दोन दिवस माहितीचे विश्‍लेषणासाठी राखीव ठेवलेले आहेत. यादी जाहीर झाल्‍यानंतर निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना सोमवार (ता. २२) ते बुधवार (ता. २४) दरम्‍यान प्रवेशासाठी मुदत असणार आहे. कोट्याच्‍या जागांवरही प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत या राखीव जागांवर प्रवेशासाठी तिसरी फेरी पार पडत आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना राखीव जागांवर प्रवेशाची संधीदेखील उपलब्‍ध असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस; शिंदेंचा आमदार बरळला

Aditi -Siddharth Wedding : प्रेम जे कधीच संपणार नाही...अखेर अदिती -सिध्दार्थने बांधली लग्नगाठ ; साध्या पद्धतीत पार पडला विवाहाचा थाट

चिपळूण ते मुंबई! कोकणच्या शुभम शिंदे Pro Kabaddi मध्ये लैय डिमांड; पाटणा पायरेट्सकडून गाजवणार मैदान

Pune Ganpati Visarjan: पुण्यात विसर्जनावेळी पार्किंग कुठे, रस्ते कोणते बंद? मिरवणुकीसंदर्भातील सगळी माहिती इथे वाचा

Dhangar Reservation: मुख्यमंत्री म्हणतात देऊ, पण महायुतीतच धनगर आरक्षणाला विरोध!; 'या' नेत्यानं स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT