Suhastai Joshi esakal
नाशिक

Nashik Kala Katta: सुरेल, आनंदयात्री चित्रकार : सुहासताई जोशी

सकाळ वृत्तसेवा

"कुणी म्हणेल चित्रकार कधी सुरेल असतो का, मलाही असंच वाटायचे. पण नाशिकच्या जेष्ठ चित्रकार सुहासताई जोशी यांच्या ‘व्हीनस’ चित्रकला ॲकॅडमीला भेट दिली आणि तिथे मला प्रकर्षाने जाणवलं की सुरेलपणा हा केवळ गाण्याचा नव्हे तर प्रवाही कला जीवन जगण्याचाही गुण असतो.

सुहासताईंसाठी संगीत हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून प्रेरणेचा तो एक नवजागर आहे, चित्रकलेला नवउर्जा देणारा. तालासुरांच्या साक्षीने, चित्रकलेच्या रंगपटावर उदयस्थ झालेला श्रवणानंदाचा हा जागर कलाकाराला आतून काहीतरी देत असतो.

कारण साऱ्या कलांबरोबरच जीवन कलेचीही वाट उजळविणाऱ्या तेजाचा तो अंश असतो. हा तेजांश, कलेतून शोधण्यासाठी जे कलासाधक स्वताच्या कलेचा परीघ ओलांडून दुसऱ्या कलेच्या परिघाकडे पाहू शकतात, अशा कलासक्त साधकांपैकी एक म्हणजे जेष्ठ चित्रकला गुरू सुहासताई जोशी.

‘सकाळ’ च्या वाचकांशी संवाद साधताना त्या म्हणतात, संगीत हा मनाला आल्हाद आणि आनंद देणारा एक असा कलासंवाद आहे, ज्यामुळे आपल्याला आपल्याच मनोविश्वाशी एकरूप होता येते, ही एकाग्र अवस्थाच कलेतील स्वसंवादाला बोलतं करणारी असते."

- तृप्ती चावरे- तिजारे.

(Nashik Kala Katta Mellow Anandayatri Painter Suhastai Joshi)

सुहासताईंची व्हीनस ॲकॅडमी म्हणजे संगीतातील सप्तसुराच्या साथीने चित्रकलेतील सप्तरंगांची उधळण करणारी चालती बोलती सूरचित्र मैफिलच. मैफिलीत त्यांचे विद्यार्थी चित्रकलेतला आनंद तालासुरांच्या साक्षीने गिरवीत आणि रूजवित असतात.

पहिल्या पाठाची सुरुवात होते पु. शी. रेगेंची ‘आनंदाची गोष्ट’ सांगण्यापासून. एका मोराची आणि एका मुलीची ही गोष्ट. गोष्टीतला हा मोर त्या मुलीच्या अंगणात तेव्हाच येतो जेव्हा ती आनंदी असते. त्यामुळे तिला दुखी होण्यास परवानगीच नाही.

ही गोष्ट सुहासताई त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याला, जणू गोष्टीतली ‘ती हसरी मुलगी’ बनूनच समरसून सांगत असतात. मला वाटतं, कला शिक्षणाचा पहिलाच धडा असा आनंदाने गिरवला गेला तर कलेचं आणि आनंदाचं अव्यक्त नातं सहजच कळू शकतं.

स्वताच्या कलेबद्दल सुहासताईंची भूमिका आणि वैचारिक स्पष्टता, तसेच भारतीय लघुचित्र शैलीबद्दल त्यांना वाटणारी आस्था आणि बांधिलकी यातून त्यांनी घडविलेल्या विचारांचे दर्शन घडते. त्यांच्या चित्रकलेचे निसर्गात असलेल्या लयबद्धतेशी एक अविभाज्य नात आहे.

नैसर्गिक रंग हा त्यांच्या कलेचा आत्मा आहे. भारतातल्या अनेक पारंपारिक कलाकारांकडून शिकण्याचे भाग्य त्यांना मिळाले. त्या प्रेरणेतून या कलांचे योग्य जतन आणि संवर्धन करण्याचे काम त्या अविरत करीत आहेत.

विविध भारतीय आदिम कलांचा उत्तम संगम दर्शविणारी, तसेच प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य शोधून ते स्वताच्या नजरेतून चित्ररूपातून मांडण्याची त्यांची शैली ही बघणाऱ्याची दृष्टी खिळवून ठेवते. मधुबनी, ओरिया, पट्टचित्र, गोंड, चित्रकथी (पैठण), गुरजरी, कलमकारी, फडचित्र, मंजुषा, हजारीबाग, पिठोरा, संथाल, कालीघाट, कर्नाटकातील चामड्यापासून बनवलेल्या बाहुल्या, भिल्ल चित्र, लिप्पन अशा अनेक कलाकृतींनी सुहासजींचा वैयक्तिक संग्रह समृद्ध झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आजच्या तरुण पिढीला संदेश देताना त्या म्हणतात, संगीतात जसा रियाज रोजच्या रोज केला जातो तसेच चित्रकला क्षेत्रातदेखील सराव हा रोजच्या रोज हवा. सराव कितपत झालाय हे रेषांचा पोत बघून लगेच लक्षात येते. सरावामुळे आत्मविश्वास वाढतो आणि तो चित्रातदेखील दिसतो."

कलाकारांचे परिसंवाद

मुलांच्या प्रगतीबरोबरच त्यांचे मनोविश्व मोठे करण्याची सुहासताईंची पद्धत त्यांच्यातील गुरूपणाचा परीघ विस्तारणारी आहे. मुलांचे कलाविषयक ज्ञान चौफेर होण्यासाठी, तसेच त्यांना इतर कलांमधील परस्पर संबंधांचे ज्ञान व्हावे यासाठी त्या इतर पूरक कला आणि कलाकारांचे परिसंवाद आयोजित करतात.

प्रत्येक विद्यार्थी स्वताच्या क्षमता आणि मर्यादा ओळखून पुढे जात असतो हे खरे, परंतु त्याच्या मनात सुहासताईंच्या सुरेल आणि आनंदी चित्रालयाची जी मुद्रा कोरली जाते ती कायमचीच. काही कलाकार कलेची वाट

एकट्याने चालणारे असतात तर काही ती चालता, चालता आपल्या मार्गावरून अनेकांचे बोट धरून आनंदाचा लोकप्रवास निर्माण करणारे असतात. सुहासताई या दुसऱ्या प्रकारातील कलाकार, म्हणून मला त्या आनंदयात्री चित्रकार वाटतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT