Dr Rudraksh Sakrikar esakal
नाशिक

Nashik Kala Katta Part 2: दैवी देणगीचे स्वकर्तृत्वाने सोने करणारे : डॉ. रुद्राक्ष साक्रीकर

सकाळ वृत्तसेवा

"शंकराला प्रसन्न करण्यासाठी स्वतःच्या आतड्यांच्या तारा करून रावणाने ‘पिनाकी वीणा’ वाद्य वाजविल्याचे वर्णन गुरुचरित्रात आढळून येते. हे ऐकल्यापासून या वाद्याविषयी उत्कंठा शिगेला पोचली होती. नाशिकच्या काळाराम मंदिरात अनेक वर्षांनी रुद्राक्ष साक्रीकरांच्या सारंगीचे सूर निनादले आणि या सारंगीलाच पिनाकी वीणा म्हणतात, असे त्यांनी सांगितले.

या वाद्याविषयी, शैलीविषयी आणि त्यांच्या स्वतःच्या वादनाविषयी त्यांना बोलते करावे या कल्पनेने त्यांची मुलाखत घेतली. सारंगी वाद्याची रचना, स्पर्श आणि हाताळणी अतिशय गुंतागुंतीची आहे. रुद्राक्षजी म्हणतात, सारंगी हे वाद्य शिकणे तसे सोपे नाही.

ते शिकताना संयमाची कसोटी लागते. बोटांना नखांच्या खाली झालेल्या जखमा झेलून या वाद्याच्या तारांवर तीच रक्ताळलेली बोटे फिरवावी लागतात. इथूनच संयमाची परीक्षा सुरू होते. नखाखालची कातडी राठ, निर्जीव आणि कडक झाली तरच पुढे वाजवता येते.

वाद्यांचा शोध प्रकांड पंडित रावणाने लावला असे म्हणतात. राजस्थानमध्ये आजही सारंगीला रावणहत्ता असे संबोधले जाते. काही गुणीजन यालाच शततंत्री वीणा असेही म्हणतात.

बकऱ्याच्या आतड्यापासून या वाद्याच्या मुख्य तीन तारा तयार केल्या जातात. या तीन तारांवरच मुख्यतः सारंगी वादन अवलंबून असते. सारंगीचे अनेक प्रकार आहेत. नेपाळी तमाइचा, तरिंदा, दिलरुबा, ताऊस ही यापैकी काही नावे." - तृप्ती चावरे- तिजारे

(Nashik Kala Katta Part 2 Selfmade goldsmiths of divine gift Dr Rudraksh Sakrikar)

सारंगी वाद्याकडे बघताना ती मानवी चेहऱ्याप्रमाणे वाटली. मानवाकृतीच्या कल्पनेतून साकारलेले हे वाद्य. वाद्य वाजत असताना बारीक कान देऊन ऐकले तर कुणीतरी गात असल्याचा भास निर्माण होतो.

असे का होते, हे विचारले असता रुद्राक्षजी म्हणतात, सारंगी हे श्रुतीप्रधान वाद्य आहे. शिवाय तिच्या तारांमधून अनेक प्रकारचे नाद निर्माण होतात. त्यातील तीन मुख्य तारा ‘बो’ ने वाजवितात. त्याखाली तीस ते तेहतीस तरफेच्या तारा असतात.

मुख्य तारेवर सूर वाजला की ती तार, या तरफेच्या तारांसह झंकृत होते. यालाच रेझोनन्स असे म्हणतात. ज्याप्रमाणे मानवी गळ्यात सुरांची जागा पक्की नसते, पण बुद्धीला सुरांची उंची समजल्यानंतर गळ्यातून ती काढता येते, त्याचप्रमाणे सारंगीवरही सुरांची जागा पक्की नसते.

बुद्धीला सुरांची उंची समजल्यानंतर तारेला स्पर्श, दाब, बोटांचे वजन, यांची भाषा समजू लागते. या भाषेतून सुरांची आस काढता येऊ लागली तरच हे वाद्य गायकीच्या जवळ नेता येते.

माझे गुरुजी पं. संतोष मिश्रा यांनी सारंगीची आस विषयावर गायकी अंगाने तर काम केलेच पण स्वतंत्र सारंगी वादनातही झाला, जोड, लय, छंद, खंड यांचे प्रयोग करणारे ते महान कलाकार होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांनी विकसित केलेल्या सारंगीतील उजव्या हाताच्या तंत्राचा विचार फार कमी लोकांनी केला आहे. सारंगी वाद्याला पूर्वीच्या काळी मैफलीत फारशी प्रतिष्ठा नव्हती. ते केवळ कोठ्यावर किंवा मुजऱ्यासाठी वाजविले जाणारे वाद्य आहे असा अपप्रचारदेखील होता.

परंतु बनारसमध्ये मिश्रा घराण्याने वाद्याची प्रतिष्ठा समाजाला पटवून दिली आणि आज वाद्याला गायकीच्या साथीचा आणि स्वतंत्र वादनाचादेखील मान मिळाला आहे. रुद्राक्षजींची स्वतःची शैली ही गायकी आणि तंत्रकारी या दोन्ही अंगाने जाणारी आहे.

काळाराम मंदिरामध्ये दशथाट रामरक्षा या कार्यक्रमासाठी त्यांचे सारंगीचे संगीत संयोजन विशेष लक्षणीय ठरले. राग संगीतातील दहा थाटांमधील पाठोपाठचे प्रवेश त्यांनी लिलया सादर केले. संगीतातील प्रतिभा ही त्यांच्या मते एक जैवअनुवंशिकता आहे, ती असली तरच संगीतातील ‘अब्स्ट्रॅक्ट फॉर्म’ पर्यंत जाता येते.

रुद्राक्षजींची सारंगी ऐकून हा अब्स्ट्रॅक्ट फॉर्म समजतो आणि सूर ही देवाने दिलेली जन्मजात देणगी असते, हे त्यांचे विधानही नक्कीच पटते. अर्थात देवाने दिलेल्या देणगीचे स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी सोने केले म्हणून हे वाद्य आणि त्यातील निर्गुण संगीत त्यांच्या हाती लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT