"चित्रामागील औचित्य, सौंदर्य यांचा विचार करणाऱ्या बबन जाधव सरांचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन चैतन्यमय आहे. त्यांना चित्रामागील संगीत दिसण्याचे कारण म्हणजे त्यांच्या घरात वडिलांपासून उत्तम संगीत श्रवणाचे वातावरण आहे.
चित्रकलेचा आंतरपूरक कला संबंध संगीताबरोबरच ते फोटोग्राफीशी जोडताना म्हणतात, पेंटिंगप्रमाणेच संगीतात आणि फोटोग्राफीतही कॉम्पोइिशनला महत्त्व आहे. चित्रकलेतून ‘व्हीजन’ कमावली असेल तर हे कॉम्पोझिशन कॅमेरा क्लिक करण्याआधीच दिसू शकते.
ज्याची जशी व्हीजन असेल, तसे कॉम्पोझिशन तो कॅमेरामध्ये टिपतो. एखादा फोटोग्राफर कमळाच्या संपूर्ण फुलाचा हुबेहूब फोटो काढेल, एखादा आउटलाइन काढेल, एखादा त्यावरचे दवबिंदू टिपेल. एखाद्याच्या नजरेत पानांचा मऊपणा भरेल तर एखादा त्या फुलाचा सुकोमलपणा, तलम स्पर्श, नाजूक रंग, एका वेगळ्या नजाकतीने लोकांसमोर आणेल.
विषय एकच परंतु मांडणी वेगळी. आणि यालाच व्हीजन म्हणतात. साधी चहाच्या टेबलवरची कपबशी, पण कलाकाराच्या नजरेतून तिचे वेगळेपण मांडायचे असेल तर त्या दृश्यातून त्या कलाकाराला कपबशीचा आवाजदेखील ऐकू आला पाहिजे. या सगळ्या तरल निरीक्षणांची गोळाबेरीज म्हणजे व्हीजन"-तृप्ती चावरे-तिजारे.
(Nashik Kala Katta Part 2 Unraveling essence of realistic painting Baban Jadhav)
जाधव सरांना बालपणापासूनच ही व्हीजन होती. त्यांची चित्रकला इतकी प्रगल्भ होती, की शाळेत असताना त्यांच्या चित्रास विख्यात चित्रकार वा. गो. कुलकर्णी यांनी सदर चित्र विद्यार्थ्याने काढणे अशक्य आहे, असा शेरा दिला होता.
इतक्या मोठ्या कलाकाराकडून बालवयातच अशी पावती मिळविणे किती भाग्याचे आहे. परंतु, या कौतुकाने हुरळून न जाता बबन सरांनी अविरत साधना सुरू ठेवली. त्यांच्या चित्रकलेला आणि फोटोग्राफीला अनेक प्रतिष्ठित प्रदर्शनांमधून मानाचे स्थान आणि पुरस्कार मिळाले.
विविध चित्रकृती- विषयीचे ज्ञान, दर्जा व सौंदर्यस्थळे लोकांसमोर मांडण्यात त्यांचे नवनवीन प्रयोग सुरूच असतात. कलेतील सत्यदर्शन लोकांसमोर सरळ व सोप्या भाषेत मांडण्याचा त्यांचा हा प्रयत्न चित्रकलेविषयक आस्था जपणारा आहे.
नवीन पिढीला संदेश देताना ते म्हणतात, कलाविषयक परिपूर्ण अभ्यास, कलेचे शास्त्रोक्त संस्कार आणि चित्रकृतीची प्रतिभासंपन्न निर्मिती करण्याचा ध्यास कळू लागला की चैतन्याचा प्रवास सुरू झाला असे समजावे.
कलाकृतीत जोपर्यंत चैतन्य निर्माण होत नाही तोपर्यंत अखंड रियाज सुरू ठेवावा. आपली चित्रकृती आत्मिक आनंदास प्राप्त झाली पाहिजे, असा निकष चित्रकाराने स्वतःवर लादून घेतला पाहिजे. कारण जोपर्यंत चित्रात चैतन्य येत नाही, तोपर्यंत रसिकांच्या मनातही चैतन्य व आत्मिक आनंद येणार नाही.
सध्या आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर भिंतीला साजेशा अशा चित्रकृतीची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे नवीन कलाकार या मागणीप्रमाणे कलाकृती तयार करू लागले आहेत. पण यामुळे समाजात विशेष छाप सोडणारे कलाकार दुर्मिळ होवू लागले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नुसत्या निर्जीव भिंतीचे सौदर्य खुलविणारे चित्र न साकारता आत्मिक, तसेच सामाजिक जाणिवांचे मूर्त व अमूर्त चित्र निर्माण करण्याचे धाडस केले पाहिजे. बाजारात अर्धवट पिकलेली फळे विक्रीस येतातही, पण त्यात पोषण व सत्त्व नसते.
अर्धवट संस्कारांची कलाकृती समाजात अशीच दूरी व दरी निर्माण करते. म्हणून समाजात सुयोग्य संस्कार, सुयोग्य कलाविचार आणि सौंदर्यशास्त्राचा अभ्यास रुजविण्याची जबाबदारी प्रस्थापित चित्रकारांनी घ्यायला हवी.
फोटोग्राफीकडे आपण एक तंत्र म्हणून बघतो, परंतु बबन जाधव सर म्हणतात की, फोटोग्राफीत तंत्राला फक्त पंचवीस मार्कस असतात, उरलेले पंचाहत्तर बुद्धीला आणि स्वकल्पकतेला द्यावे लागतील. जो फोटोग्राफर कल्पक तोच अभिजात.
मैफिलीत गाणारा जातिवंत गवई आणि ऑर्केस्ट्रात गाणारा कलाकार यात जमीन अस्मानाचा फरक आहे. खऱ्या फोटोग्राफरच्या मनात कॉम्पोझिशन आधीच तयार असते. तो फक्त क्लिकच्या क्षणाची प्रतीक्षा करत असतो.
बबन सरांचे हे विचार ऐकून असे वाटते, की ‘कला हेच जीवन आणि जीवन हीच कला’ असे मानणाऱ्या या मनस्वी कलाकाराचे अवघे जीवनच नाशिकच्या गोदामाईच्या साक्षीने चित्रमय आणि रचनात्मक झाले आह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.