Sambol player Mohini Bhuse  esakal
नाशिक

Nashik Kala Katta: पारंपारिक प्रघाताला छेद देणारी संबळ वादक : मोहिनी भुसे

भारतीय चर्मवाद्य ही ताकदीने वाजवायची असल्याने ती केवळ ‘पुरुषप्रधान वाद्ये’ असतात, हा पारंपारिक प्रघात आजवर चालत आला.

सकाळ वृत्तसेवा

भारतीय चर्मवाद्य ही ताकदीने वाजवायची असल्याने ती केवळ ‘पुरुषप्रधान वाद्ये’ असतात, हा पारंपारिक प्रघात आजवर चालत आला. पण या प्रघाताला आपल्या नजाकती वादनाने एका महिला संबळ वादकाने छेद देत नवलाईची एक दिशा दिली. मोहिनी भुसे हे नाव आजच्या प्रयोगात्मक लोककलाक्षेत्रात, पहिली महिला संबळ वादक म्हणून झळकू लागले आहे.

नाशिकजवळच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी या छोट्याशा गावात राहणारी मोहिनी ‘सकाळ’ च्या वाचकांशी संवाद साधताना म्हणते, लोक जेव्हा मला विचारतात की आजूबाजूला इतकी सगळी वाद्ये असताना तू संबळच का निवडले, तेव्हा मला हेच वाटत असते की मी संबळ निवडण्यापेक्षा, संबळ या वाद्यानेच मला निवडले आहे. अगदी सहज निरागस भावाने मी संस्कारक्षम वयातच या वाद्याकडे आकर्षित झाले. मग माझे आणि त्याचे नाते हळूहळू घट्ट होत गेले आणि निर्मळ मनाने स्वीकारलेल्या या वाद्याशी मी केव्हा एकरूप झाले ते मलाही समजले नाही. - तृप्ती चावरे -तिजारे.

(Nashik Kala Katta Sambol player Mohini Bhuse news)

मोहिनीच्या हातात खेळणारे हे वाद्य लोकरंगभूमीवरील मुख्य आणि प्राचीन लोकवाद्य आहे. चंड आणि मुंड या प्रचंड बलशाली दैत्याचा देवीने संहार केला. त्या वेळी शरण जाऊन त्यांनी देवीकडे, तिची स्तुती गाण्यासाठी भाट होण्याचे मागणे मागितले. त्यांच्या चामडीपासून हे वाद्य तयार झाले, अशी पुराणात आख्यायिका आहे. तेव्हापासून देवीच्या गोंधळात या वाद्याला अग्रपूजेचा मान मिळाला असे म्हणतात.

मला वाटते, कदाचित म्हणूनच एकीकडे बळाचे अस्तित्व आणि दुसरीकडे त्याच बळाचे गर्वहरण अशा दोन्ही परस्परविरोधी भावना ‘सम’ करून दाखविणारे वाद्य म्हणून याला ‘जोड समेळ‘ किंवा ‘संबळ’ म्हणत असावेत. संबळाचा खालीवर होणारा आरोही आणि अवरोही नाद साकारून हीच समभावना मोहिनी दर्जेदारपणे व्यक्त करते. संबळाची वाद्यजोडी तबल्याप्रमाणे एक लहान, एक मोठी, पण ती दोरीच्या साहाय्याने एकमेकांना जोडलेली असते.

दोन्हींची खोडे लाकडी असतात. मादी समेळ तबल्याचे बोल, तर नर समेळ डग्ग्याचे बोल पुरवितो. उभ्याने गळ्यात घालून वाजविण्याचे हे वाद्य, बायाकडील बाजू कधीकधी दोन्ही पायात धरून वाजवतात. त्यामुळे त्याचा नाद अधिक घुमतो. संबळ वाजविणारा वादक कधीकधी झील (कोरस) धरू लागतो.

जेव्हा संबळवादक संबळ वाजवून रंगभूमी आणि आजूबाजूचा परिसर नाट्यमय, भक्तिमय करतो, तेव्हाच मुख्य नायकाचा सादरीकरणासाठी प्रवेश होतो असा संगीत नाटकाच्या नांदीसारखा याचा वादनसंकेत आहे. पण हा सगळा पुरुषप्रधान आवाका जेव्हा मोहिनी अगदी लिलया पेलते आणि साकारते, तेव्हा श्रोत्यांच्या मनावर या वाद्याची एक वेगळीच मोहिनी तयार होते.

आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना मोहिनी म्हणते, लोकपरंपरेतून साकारलेली खरंतर ही कलाच आहे, परंतु ती फुलविण्याचे एक तंत्रही आहे. पण त्यासाठी डोळस सराव लागतो. उभे राहून वाजवायचे वाद्य असल्याने, याच्या धुम्यावर विशिष्ट वेळी योग्य तेवढा दाब दिल्यास संवादी बोल निघतो. हे सगळे शिकण्यासाठी, कला आणि तंत्र या दोन्ही अंगांनी हे वाद्य शिकविणारे गणेश डोकबाणे सर हे मला गुरू म्हणून लाभले.

अपार कष्ट, जिद्द आणि चिकाटीने त्यांनी मला संबळ वादन शिकविले. संबळाची काडी पकडण्यापासून तर ठेका धरेपर्यंत त्यांनी मला, मातीच्या गोळ्याला जसा कुंभार घडवतो त्याप्रमाणे घडविले. त्यातूनच मी अशी काही बहरु लागले, की मला तालुका स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले.

माझ्या या यशामध्ये राजेंद्र भावसार सरांचाही खूप मोठा वाटा आहे. कारण त्यांनी शाळेच्या वतीने मला संबळ घेऊन दिल्यामुळे, न्यू इंग्लिश स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज वडांगळी येथून माझ्या संबळ वादनाचा श्रीगणेशा झाला. ज्या वाटेवरून मोहिनी चालते आहे, ती जगावेगळी वाट चालण्यासाठी, शिक्षकांची, समाजाची आणि कुटुंबीयांची साथही महत्त्वाची असते.

संगीताची आवड जपणारे आप्तेष्ट आणि संस्कारसंपन्न गुरूंची शिकवण यामुळे कॉलेज आणि शालेय स्तरावर मोहिनी अनेक कार्यक्रम गाजवू लागली. बघता बघता नाशिक, पुणे, मुंबई आणि हळूहळू सर्वदूर ही संबळ मोहिनी गाजू आणि दुमदुमू लागली. या नव्या नारीशक्तीची दखल वॄत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांनाही घ्यावी लागली आणि मोहिनी छोट्या पडद्यावरूनही झळकू लागली.

गोंधळातील संबळ आता महाराष्ट्राच्या प्रायोगिक लोकरंगभूमीवर दाखल झाला आहे. या लोकवाद्याचे वादन हे आदिम, निर्भीड, थेट, कडक आणि लोकधुनांना ताल पुरविणारे असे आहे. सादरीकरणात रंग भरण्याचे काम, उठाव देण्याचे काम संबळ हे लोकवाद्य करीत असते. या वादनक्षेत्रात नव्या संधी आहेत तशीच आव्हानेदेखील आहेत.

या आव्हानांबद्दल बोलताना मोहिनी म्हणते, लोकांचा या लोकवाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही संकुचित आहे. या वाद्यातून प्रसिद्धी मिळणार नाही, असे मला अनेकजण अनेकदा सुचवतात. पण प्रसिद्धीच्या पलीकडचा माझ्या अंतरंगातला आवाज मला ठामपणे सांगत असतो, की संबळाशिवाय माझे आयुष्यच नाही.

त्यातील एक माझा श्वास आहे, तर दुसरा उच्छवास. त्यातूनच मला अनोखे आत्मिक समाधान मिळते आणि संबळाने दिलेली ऊर्जाच मला नेहमीच पुढे जाण्यासाठी बळ देत असते. पुरुषाचे आणि नारीचे ‘बळ सम’ होते आहे. खऱ्या अर्थाने जमाना बदलतोय, ‘संबळ’ होतोय हा फार मोठा संदेश छोट्याशा गावातली मोहिनी सर्वदूर पोचवते आहे, याचा नाशिकच्या कला संस्कृतीस अभिमान आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान हे फक्त एक पुस्तक नाही' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT