Vidya Karanjikar esakal
नाशिक

Nashik Kala Katta: रंगभूमीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या चतुरस्र अभिनेत्री : विद्या करंजीकर

सकाळ वृत्तसेवा

"‘झी मराठी’ या वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’, या मालिकेतून ‘आईसाहेब’ ही व्यक्तिरेखा आपल्या सहज सुंदर अभिनयाने गाजविणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री विद्याताई करंजीकर म्हणजे रंगभूमीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या मूळच्या कलासक्त रंगकर्मी. ‘सकाळ’ वाचकांशी संवाद साधताना त्या म्हणतात, अभिनय म्हणजे तुम्ही जे नाही आहात ते आहात असं आत्मविश्वासानं दाखवता येणं. दैनंदिन जीवनात प्रत्येक जण काही ना काही अभिनय करतच असतोच, पण तो अभिनय म्हणून दर्शकांना दाखवता येणे हे एक वेगळं आव्हान आहे." - तृप्ती चावरे- तिजारे

(Nashik Kala Katta smart actress who loves theater dearly Vidya Karanjikar sakal interview)

विद्याताईंचं हे वाक्य मला अभिनयातून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास या अर्थाने फार महत्त्वाचं वाटतं. रोजच्या जगण्यात आपल्याला छोट्या- छोट्या गोष्टीतही अभिनय हा करावाच लागतो, पण त्याची कदाचित आपल्याला जाणीव होत नसते.

समजा, जरी आपण हा अभिनय करत नाही आहोत असे आपल्याला वाटले, तरी आपल्या आजूबाजूची माणसं त्यांचा अभिनय करीतच असतात. रंगभूमी आणि छोटा पडदा ही अभिनयाची अशी प्रयोगशाळा आहे, शिकण्याचे, जपण्याचे आणि जगण्याचे तंत्र आणि रहस्य शिकवणारी रंगीत प्रयोगशाळा.

असे म्हणतात की, अभिनय हा व्यवस्थित शिकून केला तर मुखवटा गळून चेहरा समजू लागतो, आपला आणि समोरच्याचाही. विद्याताईंकडून मुखवटा आणि चेहरा यातील पुसटशी रेषा ओळखण्याची ही साधना बालपणापासूनच सुरू झाली.

दुसऱ्या इयत्तेत असतानाच त्यांचे बालरंगभूमीवर पदार्पण झाले. जयश्री पाठक आणि नाडकर्णी मॅडम यांचे बोट धरून त्यांनी मुंबईच्या बालकुमार केंद्रातल्या आंतरशालेय एकांकिकांपासून सुरवात केली, तसेच आंतरमहाविद्यालयीन व राज्य नाट्यस्पर्धा चांगल्याच गाजविल्या.

यानंतर स्वतःच्या अनुभवातून, बारीक निरीक्षणाने व अथक परिश्रमाने आपल्या अभिनयाला पैलू पाडत पुढे १९७७ साली त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. १९८५ साली ‘आई शपथ’ या नाटकातून त्यांनी नाना पाटेकर यांचे सोबत केलेला अभिनय रंगभूमीने लक्षात ठेवला.

त्यानंतर प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले, वर्षा उसगावकर यांच्यासोबत केलेले ब्रम्हचारी, भ्रमाचा भोपळा, वटवट सावित्री या नाटकातून विद्या ताईंनी केलेला सहज, सुंदर व प्रवाही अभिनय रसिकांनी अक्षरश डोक्यावर घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या दरम्यान त्यांच्यावर खऱ्या अर्थाने संस्कार केले ते दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर यांनी. त्यांना विद्याताई गुरुस्थानी मानतात. महाविद्यालयात असताना सतीश पुळेकर, विजय केंकरे यांच्या सहवासाने त्या समृद्ध झाल्या.

पण रंगभूमीवरचा पहिला अंक होता होताच जीवनात एक मोठा मध्यंतर‌ही आला. तब्बल २३ वर्षांचा मध्यंतर. या प्रदीर्घ काळाच्या ‘कमबॅक’ नंतर विद्याताईंनी छोटा पडदा आपलासा केला. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या सोबत ‘तुला पाहते रे़, या मालिकेने त्यांना घवघवीत यश देत घराघरांत नेऊन पोचवले.

या मालिकेतील आईसाहेब या त्यांच्या भूमिकेतील दरारा, श्रीमंती आणि जातिवंत कुलीन, शालीन अभिनय सर्वत्र वाखाणला गेला. इतका की नाशिकच्या गावकोसात त्यांच्या या व्यक्तिरेखेचा दरारा जपला जाऊ लागला.

विद्याताईंनी ‘सकाळ’ परिवारात प्रत्यक्ष काम केल्यामुळे त्यांचा ‘सकाळ’ शी फार जवळून संबंध आला आहे, म्हणूनच आज वाचकांशी संवाद साधताना त्यांना विशेष आनंद होतो आहे. रंगभूमी ते छोटा पडदा या प्रवासात त्यांनी केलेली निरीक्षणे व त्यातून घडविलेला अभ्यासपूर्ण हा विचार नवीन पिढीला पथदर्शक ठरणार आहे.

स्वतःची अशी एक वेगळी शैली निर्माण करून प्रत्येक व्यक्तिरेखेस ओळख देणाऱ्या विद्याताईंच्या रंगभूमीवरील विचारांविषयी अधिक जाणून घेऊया पुढील भागात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

SCROLL FOR NEXT