Samrudh Kute esakal
नाशिक

Nashik Kala Katta: कलावारसा समृद्ध करणारे समन्वयवादी बासरीवादक : समृद्ध कुटे

सकाळ वृत्तसेवा

"भारतीय वाद्य संगीतातील प्रमुख सुषिर वाद्य म्हणजे बासरी. स्व. पं. पन्नालाल घोष यांच्यामुळे भारतीय संगीताला खयाल अंगाच्या बासरीचा परिचय झाला, तर मैहर सेनिया या प्रसिद्ध घराण्याचे विद्‍वान कलाकार पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी ध्रुपद अंगाची बासरी संपूर्ण जगभरात लोकप्रिय केली. याच परंपरेचा वारसा पुढे नेत, नाशिकचे युवा आणि प्रतिभावान कलाकार समृद्ध कुटे हे बासरी वादनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहेत. पं. हरिप्रसादजींचे एकनिष्ठ शिष्य असलेले समृद्धजी ‘सकाळ’ वाचकांशी संवाद साधताना म्हणतात, गुरुजींच्या सहवासातून प्रत्येक वेळी नवनवीन ज्ञान तर वेचायला मिळतेच, पण दरवेळी एका उच्च अवस्थेला गेलेली गुरुजींची एकाग्रता अनुभवायला मिळते. त्यांच्या गुरुकुलात आम्ही विद्यार्थी शिकत असताना एकदा मुसळधार पाऊस पडून जोरदार वीज कोसळली. आम्ही सगळे प्रचंड घाबरलो, परंतु गुरुजी त्यांच्या साधनेमध्ये तल्लीन होते. ‘ध्यान समाधी’ काय असते याचा मूर्तिमंत अनुभव आणि आदर्श मी त्या दिवशी घेतला. साधनेचा हा आदर्श आज माझ्यासह नव्या पिढीसमोर दीपस्तंभाप्रमाणे तेवतो आहे, हे मी माझे भाग्य समजतो."- तृप्ती चावरे-तिजारे

(Nashik Kala Katta Synergistic Flutist Enriching Heritage Samrudh Kute)

भाषेच्याही संस्काराआधी कलेचे संस्कार नशिबात असणाऱ्या भाग्यवान मुलांपैकी एक म्हणजे समृद्ध कुटे. त्यांची तालीम अत्यंत कोवळ्या वयातच, ते अवघ्या एका वर्षाचे असताना त्यांचे वडील अनिल कुटे यांच्याकडेच सुरू झाली.

बाबांच्या डोळस मार्गदर्शनातून मुलाच्या बासरीचा समृद्ध साधना प्रवास सुरू झाला आणि जोमाने बहरू लागला. वयाच्या अवघ्या पाचव्याच वर्षीच लहानग्या समृद्धने आपल्या बासरी वादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायला सुरवात केली होती.

पुढे त्यांचे बासरीचे औपचारिक शिक्षण कोळवण, पुणे येथील चिन्मय नादबिंदू येथे पं. हिमांशू नंदा यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल पद्धतीत सुरू झाले. २०१६ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची सीसीआरटी राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळविली.

त्यानंतर लगेचच स्पीक- मॅके शिष्यवृत्ती मिळवून विशेष उल्लेखनीय विद्यार्थी म्हणून त्यांना पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या भुवनेश्वर, ओरिसा येथील गुरुकुलात शिकण्याची संधी मिळाली.

या संधीचे सोने करताना तेथील अथक मेहनत आणि अनुभवाच्या सखोल परिणामामुळे त्यांच्या बासरी वादनास उच्च दर्जाचे कलात्मक पैलू पडू लागले. भारतभरातून सादरीकरणाचे अनेक टप्पे पार करताना त्यांची कलात्मकता आणि शैली श्रोत्यांपर्यंत पोचली आणि वाखाणली गेली.

ही शैली विकसित करताना आलेल्या अनुभवाविषयी ते म्हणतात, गुरुजींनी पहिल्या दिवसापासूनच घरंदाज विद्या दिली. बासरीवर हाताची आणि बोटांची पकड किंवा मैहर घराण्यातील ध्रुपद अंगाचे जोडकाम, मींड, झाला, लयदार ख्याल, बंदिशी, दमसास ही सगळी अंगे विकसित होत गेली.

लहानपणापासूनच यमन कल्याण हा राग बासरीवर इतका वाजवायचो, की मला तो सोपा वाटू लागला होता. परंतु गुरुजींच्या समोर पहिल्याच दिवशी हा राग शिकलो तेव्हा समजलं, की हा तर फार अवघड राग आहे.

याच्या अगदी विरुद्ध अनुभव असा आला, की दरबारी कानडा हा राग मी पूर्वी कधीही वाजवला नव्हता. गुरुजींनी तो राग लगेच शिकवायला घेतला. मला दडपण आलं, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला तो अवघड राग सहज वाजवता येऊ लागला.

असे का झाले याचा विचार केला तेव्हा मला कळले, की एखादी सोपी गोष्ट सखोल करून सांगणे आणि एखादी सखोल गोष्ट सोपी करून सांगणे या दोन्ही कला अवगत असणारे माझे गुरुजी किती महान आहेत.

पारंपरिक संगीत आणि आधुनिक संगीत यांच्यामध्ये एक मार्ग जातो. पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी हा मार्ग आधीच प्रशस्त करून ठेवलेला आहे.

आधुनिक पिढीचे प्रतिनिधी म्हणून समृद्धजींना याच मार्गावरून चालावेसे वाटते. या वाटेवरून भारतीय शास्त्रीय संगीताप्रति समृद्ध कुटे यांचे समर्पण व दिशा, भविष्यातील त्यांचा कला प्रवास समृद्ध करेल, यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: मविआनं जाहीर केली ‘लोकसेवाची पंचसुत्री’; ‘या’ पाच गोष्टींची दिली हमी

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अरुणकुमार सिंग शरण

Suraj Chavan & Janhavi Killekar : सूरज चव्हाणच्या गावी रमली जान्हवी, गावातल्या शेतात मारला फेरफटका

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Latest Marathi News Updates live: मविआकडून बीकेसीच्या सभेत पंचसुत्री जाहीर

SCROLL FOR NEXT