documents  esakal
नाशिक

Nashik Educational News : डिप्‍लोमा, डिग्री प्रवेशासाठी सज्‍ज ठेवा कागदपत्र!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना आवश्‍यक कागदपत्रे सादर करावी लागतात. मात्र अशी कागदपत्रे उपलब्‍ध नसल्‍यावर विद्यार्थ्यांसह पालकांना कागदपत्रांची जमवाजमव करताना तारेवरची कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर गैरसोय टाळण्यासाठी विविध पदविका (डिप्‍लोमा), पदवी (डिग्री) अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांचा तपशील तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केला आहे. (Keep documents ready for diploma degree admission)

इयत्ता दहावी, बारावीच्‍या परीक्षा उरकलेल्‍या असताना विविध शिक्षण मंडळाचे निकालदेखील जाहीर होत आहेत. राज्‍य शिक्षण मंडळाचा निकालही येत्‍या काही दिवसांत जाहीर होणार आहे. यानंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेला वेग येणार आहे. विद्यार्थी, पालकांना ऐन वेळी कागदपत्रांसाठी धावाधाव करावी लागू नये.

यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने आवश्‍यक कागदपत्रांचा तपशील जारी केलेला आहे. त्‍यानुसार विद्यार्थ्यांना त्‍यांचे आरक्षण व पात्रतेनुसार आवश्‍यक कागदपत्रे प्रवेश प्रक्रियेदरम्‍यान सादर करावी लागणार आहेत.

या अभ्यासक्रमांसाठी कागदपत्रांची यादी

तंत्रशिक्षण संचालनालयाच्‍या आधिपत्याखाली येणारे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, प्रथम वर्ष वास्‍तू कला, औषधनिर्माणशास्‍त्र, हॉटेल मॅनेजमेंट या शाखांतील पदविका व पदवी अभ्यासक्रमांसह पदवी स्‍तरावरील बी. डिझाईन, बीबीए, बीसीए, आदी पदवी अभ्यासक्रम तसेच पदव्‍युत्तर पदवी स्‍तरावरील अभियांत्रिकी (एम. टेक).

औषधनिर्माणशास्‍त्र (एम.फार्म व फार्म डी.), एम. आर्किटेक्‍चर, एम. प्‍लॅनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, एमसीए या अभ्यासक्रमांसाठी आवश्‍यक कागदपत्रांचा तपशील जारी केला आहे. (latest marathi news)

पात्रतेनुसार आवश्‍यक कागदपत्रे-

* जात/जमात प्रमाणपत्र

* जात/ जमात वैधता प्रमाणपत्र

* अनुसूचित जाती/अनुचित जमाती व्‍यतिरिक्‍त अन्‍य मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र

* राष्ट्रीयत्‍व प्रमाणपत्र,

* उत्‍पन्नाचे प्रमाणपत्र

* आर्थिकदृष्टया दुर्बल घटक प्रवर्गासाठी (ईडब्‍ल्‍यूएस) प्रमाणपत्र

* दिव्‍यांगांबाबतचे प्रमाणपत्र

तर होणार फौजदारी कारवाई

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये काही उमेदवारांनी बनावट स्वरूपाची कागदपत्रे सादर करताना प्रवेश मिळविला होता. या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्‍यांच्‍यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती. असा संदर्भ देताना सक्षम प्राधिकरणाकडून कागदपत्रे प्राप्त न करून घेता बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करत प्रवेश रद्द ठरविले जातील, असेही स्‍पष्ट केले आहे.

"विद्यार्थी, पालकांनी संबंधित प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रे प्राप्त करून घ्यावी. ऐनवेळी कागदपत्रांची जमवाजमव करताना दमछाक होत असल्‍याने त्‍याआधीच पूर्तता केल्‍याने गैरसोय टळू शकेल. आवश्‍यक कागदपत्रांची यादी जारी केली आहे." - प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे, सहसंचालक, नाशिक विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT