Nashik Kharif Season : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्याने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात गत सप्ताहापर्यंत खरिपाच्या ७३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र, जिल्ह्यात पावसाने येवला, नांदगाव, चांदवड, मालेगाव या तालुक्यांसह पश्चिम पट्ट्यातील तालुक्यांमध्ये ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली होती. मात्र, पावसाने या पिकांना दिलासा मिळाला आहे. (Kharif crops have got boost due to moderate to light rain)
दुसरीकडे पश्चिम पट्ट्यात भात आवणीलाही वेग आला आहे. जिल्ह्यात मॉन्सूनचे वेळात आगमन झाले खरे. मात्र, अनेक भागांत समाधानकारक पाऊस नसल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या लांबल्या होत्या. १ जुलैपर्यंत केवळ २२ टक्के खरिपाची पेरणी झाली होती. गेल्या वर्षीही पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पेरणी क्षेत्र घटले होते. यंदा पेरणी क्षेत्रात ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात सहा लाख ४१ हजार ७७१ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित केले असून, त्यापैकी गत आठवड्यापर्यंत चार लाख ६४ हजार १६९ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. (latest marathi news)
यात मका व सोयाबीनची उद्दिष्टांपेक्षा जास्त पेरणी झाली. पेरणी झालेली असली, तरी गत दोन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली होती. नऊ तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त, तर सहा तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद होती. सुरवातीस दुष्काळी तालुके असलेल्या येवला, नांदगाव, चांदवड व मालेगाव तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. दमदार पावसामुळे या भागात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, या भागात पावसाचा खंड पडल्याने या भागातील पेरण्या संकटात सापडल्या होत्या.
पुरेसा पाऊस न झाल्यास दुबार पेरण्यांचे संकट उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २१) रात्रीपासून जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली. सोमवारी (ता. २२) दिवसभरही पावसाची रिमझिम सुरू होती. हा पाऊस सर्वव्यापी आहे. त्यामुळे या पावसाने संकटात सापडलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व कळवण या भागांत पावसाचा जोर चांगला आहे. त्यामुळे या भागातील भाताची आवणी अन लागवडीला वेग आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.